शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदी अखेर महादेवआप्पा एकलारेंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 16:35 IST

Hingoli ZP News : सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिपाक म्हणून एकलारे यांची निवड अपेक्षित होती.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे दोन सदस्य पुन्हा फुटल्याने त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर

हिंगोली: जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदी अखेर वसमत तालुक्यातील बाबुळगाव गटातील महादेवआप्पा एकलारे यांची निवड झाली आहे. त्यांनी २९ मते मिळविली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास साळुंके यांना २१ मते मिळाली.

सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिपाक म्हणून एकलारे यांची निवड अपेक्षित होती. मात्र राष्ट्रवादीचे दोन सदस्य पुन्हा फुटल्याने त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्य सभागृहात सध्या ५० सदस्य आहेत. कनेरगाव नाका येथील गंगासागर भिसे आणि आंबा येथील राजेंद्र देशमुख या दोन सदस्यांच्या अपात्रतेमुळे त्यांना सभेला हजर राहता येणार नव्हते.

उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हे पीठासीन अधिकारी होते. सकाळी अकरा वाजता सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. एकलारे व सोळुंके यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. दुपारी दोन वाजता सभेला प्रारंभ झाला. मतदानाअंती एकलारे यांची २९ मते घेतल्याने निवड घोषित करण्यात आली. त्यांना शिवसेनेचे १५, भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचे तीन, अपक्ष २ व राष्ट्रवादीचे ९ असे त्यांना मतदान झाले. तर सोळुंके यांना भाजपचे ११, काँग्रेसच्या सातव गटाचे ७, अपक्ष अजित मगर व राष्ट्रवादीच्या प्रल्हाद राखुंडे आणि संजय कावरखे यांनी मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तसेही राखुंडे यांनी शिवसेना जवळ केली असून कावरखे भाजपच्या मार्गावर आहेत. निवडीनंतर एकलारे यांचा जि. प .अध्यक्ष गणाजी बेले यांच्या दालनात आमदार संतोष बांगर,आमदार राजू नवघरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण व सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना