शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तूर कापणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

फाळेगाव फाट्यापर्यंतचा रस्ता उखडला फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव ते फाट्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गावापासून ते फाट्यापर्यंत असलेला ...

फाळेगाव फाट्यापर्यंतचा रस्ता उखडला

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव ते फाट्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गावापासून ते फाट्यापर्यंत असलेला अडीच किमीचा रस्ता अर्ध्या अंतरापर्यंत चांगला असून, उर्वरित मात्र पूर्णपणे खराब झालेला आहे. यामुळे वाहनधारकांना दररोज या रस्त्यांवरून ये-जा करणे अवघड झाले आहे.

पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील काही भागातील विहीर व बोअर आटले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी गावासह शेतशिवारात भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस गावातील अनेक बोअर आटू लागले आहेत. यामुळे अनेक गावकरी पाण्यासाठी भटकत असल्याचे दिसत आहेत.

पथदिवे दुरुस्तीची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील पथदिवे बंद आहेत. मागील सहा ते आठ महिन्यांपासून गावातील पथदिवे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. यासाठी लवकरात लवकर गावातील पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. रात्रीच्या वेळी संपूर्ण गावात अंधारमय वातावरण होत आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : कळमनुरी तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरातील बससेवा कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व कारभार सुरू झाले असून, कळमनुरी येथील आगारातून असणारी ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पांगरा शिंदे, पोतरा, वाई व इतर परिसरातील गावांतून होत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गावातील वीज खंडित होत असल्याने गावातील दैनंदिन कामकाजासह शेतीच्या कामकाजावरही परिणाम पडत आहे. यासाठी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला

हिंगोली : शहरातील रिसाला बाजार, आदर्श कॉलेज रस्ता आणि जय भारत शाळेसमोरील रस्त्यांवर कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीमागे हे कुत्रे लागत असल्याचेही घडत आहे.