शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

भीती ! लसीकरण यादीत नाव असूनही धाडस होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील दोन केंद्रांवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून, काहीजणांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : जिल्ह्यातील दोन केंद्रांवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून, काहीजणांना भीती वाटूनही ते ‘शक्तीमान’च्या भूमिकेत आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस देण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील या दोन्ही केंद्रांवर रोज १०० जणांना लस देण्यात येत आहे. १६ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत ७६८ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. ही लस आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार यादिवशी देण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० कोरोना लसीचे डोस आलेले आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना लस घ्यावीच लागणार, अशा सूचनाही आहेत. ज्यांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे ते लस घेऊन आलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवकांना ‘काही त्रास होतो का’? असे विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ताप, अंग दुखणे या कायम तक्रारी

कोरोना लस घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून ताप येण्यास सुरुवात होते. यानंतर डोके जड होणे, अंग दुखणे या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर मात्र आराम पडतो. नंतर बरेही वाटू लागते. कोणतीही लस घेतली तरी समस्यांना तोंड जावे लागते, असा अनुभव कोरोना लस घेतलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कथन केला.

लस घेतल्यानंतर एक दिवस ताप आला, डोकेही काही प्रमाणात दुखले, थोडा थकवाही जाणवला. परंतु, आता मात्र कोणताही त्रास होत नाही. सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे.

- डॉॅॅ. नामदेव पवार, हिंगोली

मला पहिल्या दिवशी ताप आला होता. नंतर मात्र बरे वाटू लागले. मी पहिल्यापासून लस घेणार आहे, असेच सांगितले. नोंदणी केलेल्या डॉक्टरांनी लसीबाबत घाबरण्याचे काहीही कारण नाही.

- डॉॅॅ. मंगेश टेहरे, हिंगोली

कोरोना लस घेतल्यानंतर प्रथम ताप येतो. थोडे अस्वस्थही वाटू लागते. डोकेही जड झाल्यासारखे जाणवू लागते. या लसीमध्ये साईड इफेक्ट काही नाही. थोड्याथोडक्या समस्या जाणवू लागतात. ताप एक दिवस राहून नंतर मात्र आराम वाटू लागतो. नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी व सेवकांनी ही लस न घाबरता घ्यावी. - डॉॅॅ. व्ही. एन. रोडगे, हिंगोली

कोणतीही लस घेतल्यानंतर अंग दुखणे, ताप येणे हा प्रकार असतो. कोरोना लस घेतल्यानंतर एक दिवस ताप आला, डोके जड झाले. आता मात्र काहीही त्रास नाही.

- ज्योती पवार, हिंगोली

थोडी धाकधूक असली तरी मी लस घेणार आहे. लस घेण्यासाठीच मी नोंदणी केली आहे. लसीला घाबरणार नाही. कोरोना लस घेतल्यानंतर ताप येणे, अंग दुखणे हा प्रकार मला समजला आहे.

- डॉॅॅ. सुनील जाधव, हिंगोली

१६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण सत्रात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन सर्वसामान्य जनतेत लसीकरणाविषयी विश्वास निर्माण करावा. आतापर्यंत दोन केंद्रांवर ७६८ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलेली आहे. गंभीर स्वरुपाचा साईड इफेक्ट कोणताही दिसून आलेला नाही.

- डॉॅॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली