शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कडबा विकल्याच्या रागातून बापानेच केला लेकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:16 IST

बापास पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

आडगाव रंजे (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गुंडा येथे बापानेच लेकाचा खून केल्याची खळबळजनक घटना ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. आरोपी बापास पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

सविस्तर माहिती अशी की वसमत तालुक्यातील गुंडा शेत शिवारातील कॅनॉलच्या परिसरामध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ऊद्धव सखाराम खिल्लारे (३२) याच्यासोबत त्याचे वडिल सखाराम खिल्लारे याने ‘शेतातील कडबा का विकतो’ या कारणावरून वाद घालत डोक्यात रूमनाने मारहाण केली. मारहाणीत उद्धव खिल्लारे याच्या डोक्यात जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गुलाब बाचेवाड डी.एन.मुलगीर तसेच जमादार जीवन गवारे, बबन राठोड, ईम्रान सिद्दीकी, शेख नय्यर, गणेश लेकुळे, संदीप बोचरे आदी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून  प्रेत शवविच्छेदनासाठी वसमत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबत मयताचे वडील सखाराम यादव खिल्लारे (६०) रा. गुंडा ता.वसमत यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस उपअधीशक मुदीराज यांनीही भेट देऊन पाहणी केली. गावात खून झाल्याच्या  घटनमुळे खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोलीPoliceपोलिस