शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात समावेशासाठी प्रजासत्ताकदिनी ८ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील काही गावे ही नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर व जवळपास वसलेली आहेत. कळमनुरी तालुका व हिंगोली जिल्ह्याचे ...

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील काही गावे ही नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर व जवळपास वसलेली आहेत. कळमनुरी तालुका व हिंगोली जिल्ह्याचे ठिकाण अंतराने अधिक असल्याने डोंगरकडासह परिसरातील ८ गावांतील नागरिकांना कामे करताना फार मोठ्या अडचणींनीना सामोरे जावे लागत असल्याने नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर व जवळपास वसलेली गावे नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी डोंगरकडा कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमाेर उपाेषण करण्यात आले.

यामध्ये डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, हिवरा, वरुड, भाटेगाव, सुकळीविर, झुनझुनवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले. डोंगरकडा परिसरातील आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अर्धापूर तालुक्यात या गावांना अवघ्या १२ किमी अंतरावर आहे. तर नांदेड २५ किमी अंतरावर आहे. या भागातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, विध्यार्थ्यांचे शिक्षण, यासह अनेक कामकाज नांदेड येथे करण्यात सोयीस्कर आहेत. याउलट कळमनुरी तालुक्याचे अंतर ४० किमी आहे, तर हिंगोली जिल्ह्याचे अंतर ६० किमी आहे. त्यामुळे डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, हिवरा, वरुड, भाटेगाव, सुकळीविर, झूनझुनवाडी या गावांना दूर हाेत आहे. यामुळे या गावांचा आर्धापूर तालुक्यात समावेश करावा, या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.

याबाबतचा ग्रामपंचायतचा ठराव सर्व ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे. तलाठी राजेश क्षिरसागर, दांडिमे यांच्याकडे ठराव देण्यात आला आहे. यावेळी अशोक अडकीने, आनंद अडकीने, संजय बहात्तरे, भगवान पवार, गोविंद राठोड, भालुसिंग राठोड, पप्पू वीर, डॉ. शेख ईसा, साहेबराव सितळे, पाशा पटेल, गोविंद पारडकर, शिवलाल राठोड, यांच्यासह वरील गावांतील गावकऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला होता. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोंगरकडा चौकीचे जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, बापूराव बाभळे, प्रभाकर भोंग, यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फोटो नं.६