शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:17 IST

शेतकऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरू

ठळक मुद्देऔंढा नागनाथ तालुक्यातील घटना

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही शासनाने अद्यापही नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे  अन् शासनानेही पंचनामा केला नाही. त्यामुळे प्रकाश इंगोले या तरूण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील उंडेगाव येथे १ नोव्हेंबर रोजी घडली. सदर शेतकऱ्यावर औंढा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतकरी प्रकाश इंगोले यांना तीन एकर शेत आहे. परंतु परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले. इंगोले हे शुक्रवारी सकाळी ६ वाजता शेतातील सोयाबीनची पाहणी करून हताशपणे घरी परतले. घरी आल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी द्रव प्राशन केला. काही वेळाने त्यांच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह मनोज मुळे, संघरत्न इंगोले, अनिल वाघमारे, ऋषिकेश इंगोले, भारत दामोदरे, लक्ष्मी रणवीर आदींनी धाव घेऊन इंगोले यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकाश इंगोले यांना पत्नी,  दोन मुले व आई असा परिवार आहे.  त्यांच्या परिवाराचे  शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. परंतु परतीच्या पावसामुळे जोमात असलेले सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाल्याने प्रकाश इंगोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नागरिकांनी सांगितले.

पंचनाम्याचे आदेशऔंढा नागनाथ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सेवक यांना दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती