शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

दर्जाहीन रोपांमुळे शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:11 PM

परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.गोरेगावसह परिसरातील निवड झालेल्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानास सुरूवात झाली आहे. कृषी सहाय्यक जी.बी. काळे, कृषी पथकाच्या वतीने केलेल्या जनजागृृती, सूक्ष्मनियोजन प्रकियेनंतर विविध कृषी विकास कामे प्रस्तावित करून ग्रामपंचायतकडून आराखड्यास मंजुरी दिली होती. यात प्रस्ताव सादर करीत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दर्शविला होता.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरअखेर फळबाग लागवडीस सुरूवात झाली असून जमिनीतील पाणीपातळी खालावल्यामुळे विहिरी, बोअरवेल डबघाईस आल्याने शेती सिंचनाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे लाभधारक शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या परमिटवर शासनमान्य रोपवाटिकेतून दर्जाहीन रोपांचा पुरवठा होत असल्याची शेतकºयांची ओरड आहे. दर्जेदार रोपे उपलब्ध नसल्याने फळबाग योजनेला खोडा बसल्याचे अनुभवयास मिळत आहे. वसमत तालुक्यातील रिधोरा येथील श्रीकृष्णा रोपवाटिकेतून रोपे दिली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. वाढ खुंटलेली रोपे असून त्यांच्या जातीविषयी कुठलीच हमी दिली जात नसल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी गत होत आहे.याबाबत कृषी सहाय्यक जी.बी. काळे यांना विचारल्यावर ते म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठात रोपांचा तुटवडा असून शासनमान्य नर्सरीतून रोपपुरवठा होत आहे. त्यात फसवणूक झाल्यास शेतकºयांनी रीतसर तक्रार करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी