शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंदमुळे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:30 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. आमच्या तुरीची मोजणी करुन घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी शेतकºयांनी घेतली. या गोंधळात काही शेतकºयांनी बाजार समिती सचिवास धक्का-बुक्की केली.शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र १८ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर तुर घेऊन आलेल्या ८७ शेतकºयांची दीड हजार क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. सदर शेतकºयांनी मागील पाच दिवसांपासून नाफेड केंद्रावर तूर आणली होती. परंतु केंद्र बंद करण्याच्या निर्णयामुळे या शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप होऊन शकले नाही. मागील पाच दिवसांपासून तुर घेऊन आलेल्या शेतकºयांनी ‘आमची तूर खरेदी करावी त्यानंतरच खरेदी केंद्र बंद करावे’ अशी आक्रमक भूमिका स्वीकारत गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील रिसोड रस्त्यावरील खरेदी केंद्रावर गोंधळ करत बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांना घेराव घातला व धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ वाढला व तणाव निर्माण झाला. तसेच आमच्या तुरीचे मोजमाप करा अशी मागणी काही शेतकºयांनी मोबाईलद्वारे थेट सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. तसेच दुपारच्या सुमारास तहसीलदार वैशाली पाटील यांनी शेतकºयांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंरतु आमची तूर मोजून घेण्याची लेखी हमी द्या या मागणीवर शेतकरी ठाम होते.सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. शेतकरी कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. यावेळी आंदोलनाला जि. प. चे उपाध्यक्ष यांनी भेट देऊन शेतकºयांचे गाºहाणे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या कानावर घातले. त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारी यांनी ८७ शेतकºयांचे मोजमाप करून घेण्यासाठी शासनाकडे मागणी करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकºयांनी लेखी आश्वासनामुळे आंदोलन स्थगित केले.तीन दिवसांत तुरीचे मोजमाप न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला. यावेळी आंदोलनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सपोनि बालाजी येवते, गोरेगाव ठाण्याचे पोनि सोनवणे, फौजदार किशोर पोटे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकही पाचारणकरण्यात आले. अचानक सुरू झालेले आंदोलन तीन तास सुरू होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रस्त्याच्या दोन्ही बांजूंनी १ किमी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ये-जा करणाºयांची एकच धावपळ झाली. यावेळी वाहतूक काही वेळ ठप्प होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी