शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे.औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील शिवजी कºहाळे या शेतकºयाने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करीत असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खा.राजीव सातव,आ.डॉ. संतोष टारफे, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शेळके, बाबा नाईक, रमेश जाधव, केशव नाईक,मारोती कºहाळे, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, संदीप गोबाडे, बापूराव घोंगडे, पंकज जाधव, ऋषिकेश देशमुख, दिग्विजय बायस आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, शासनाने राबविलेली कर्जमाफी फसवी आहे.शेतकºयांना याचा फायदा कमी नुकसान जास्त झाले आहे. नोटबंदीमुळे उद्योगपतींना फायदा झाला. याचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला आहे. आधीच दुष्काळ त्यात शेतीमालाला कमी भाव यामुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आॅनलाईनच्या त्रांगड्यात शेतकरीच आॅफलाईन झालो. अशा परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने राज्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. हा विषय घेऊन सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार आहे. यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला परिपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.दौºयादरम्यान वगरवाडी येथील शेतकºयांनी रस्त्यावर गाड्या थांबवून विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या ताफ्याला शेतात नेले. यावेळी शेतकºयांनी विविध व्यथा मांडल्या. तेव्हा विखे यांनी उपस्थित अधिकाºयांना तालुक्यातील वास्तव मांडून वसमत व औंढा नागनाथ तालुका दुष्काळी यादीत घेण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्याकडे नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस