शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वाद विकोपाला गेले, सासऱ्याने जावयाला हातपाय बांधून विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:39 IST

चांगेफळ शिवारातील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली  

ठळक मुद्दे  मयताचा सासरा व त्याच्यासोबतचे तीन ते चार साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल

नर्सी नामदेव :  हिंगोली तालुक्यातील चांगेफळ शिवारामध्ये हरिश्चंद्र शिंदे यांच्या विहिरीमध्ये सोमवारी अनोळखी मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. अखेर मयताची ओळख पटली असून त्याचे नाव वैभव जयचंद वाठोरे ( रा. शिंदेफळ ता. सेनगाव, हल्ली मु. कमलानगर हिंगोली ) आहे. सासऱ्यानेच जावयाचा घात करून खुन केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी नर्सी नामदेव पाेलीस ठाण्यात  मयताचा सासरा व त्याच्यासोबतचे तीन ते चार साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, साेमवारी हिंगोली तालुक्यातील चांगेफळ शिवारामध्ये हरिश्चंद्र शिंदे यांच्या विहिरीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळुन आला हाेता. सदरील घटनेची माहिती मिळताच  हिंगाेली उपविभागीय पोलीस अधिकारी यातिश देशमुख,पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार नर्सी पोलीस ठाण्याचे सपोनि सदानंद येरेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रथम युवकाची ओळख पटली नव्हती. परंतु पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवित शोध घेतला असता मयत हा वैभव जयचंद वाठोरे (२१) रा. शिंदेफळ ता. सेनगाव, हल्ली मु. कमलानगर हिंगोली येथील असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले आहे. मयत वैभव वाठाेरेचे मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते, हे वाद विकोपाला गेले. अखेर मयत वैभव वाठाेरे यांचे सासरे आरोपी मधुकर नामदेव लोणकर (तलाठी) रा. जिजामाता नगर हिंगोली याने व इतर तीन ते चार साथीदारानी संगणमत करून जावई वैभवचा काटा काढण्याच्या ठरविले. 

'आपणास बाभुळगाव येथे वाळुचे ट्रॅक्टर पकडायला जायचे आहे’ असे म्हणून वैभव यास सोबत घेऊन गेले. त्यानंतर आराेपी मधुकर लाेणकर व इतर तीन ते चार साथीदारांनी वैभव यास चांगेफळ शिवारातील एका विहिरी मध्ये हातपाय बांधून जीवे मारून टाकून दिले. अशा आशयाची फिर्याद मयताचे वडिल जयचंद काशिनाथ वाठोरे यांनी नर्सी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मयत युवक वैभव वाठाेरे यांचा सासरा आरोपी मधुकर लोणकर व इतर तीन ते चार साथीदाराविरुद्ध भादंवि ३०२ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास नर्सी पोलीस ठाण्याचे सपोनि सदानंद येरेकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीMurderखून