शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. मात्र जादा किंमत ...

हिंगोली : कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. मात्र जादा किंमत मोजूनही हिंगोली शहरात संत्रा, मोसंबी मिळत नसल्याचे चित्र आहे. ठोक बाजारातही फळे मिळत् नसल्याने मोजक्याच व्यापाऱ्यांकडे फळे दिसून येत आहेत.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन करीत असल्याने बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. त्यात लिंबू, संत्री, मोसंबी या फळांना तर मोठी मागणी वाढली आहे. लिंबू या फळामध्ये व्हीटॅमिन सी असते. त्यामुळे शरिराचे कार्य टिकून ठेवण्यास व रोग प्रतिकार शक्ती नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय पचनक्रीयाही मजबूत होण्यासह रक्त शुध्द होण्यास मदत होते. संत्री हे सुद्धा शक्तीवर्धक फळ असून या फळाचे सेवन केल्यास शरीर व मन थंड राहते. थकवा, तणाव दूर होण्यास मदत होते. मोसंबी फळातही ए,बी,सी हे जीवनसत्व असल्याने पचनक्रीया सुधारण्यास मदत होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

दुपटीने वाढले दर

मोसंबी, संत्रीचे दर मागील महिन्याच्या तुलनेत दुपट वाढले आहेत. मागील महिन्यात १०० रूपये किलोप्रमाणे मिळणारी मोसंबी आता २०० रूपये मोजूनही मिळत नाही. तर संत्रीचे दरही दुप्पट वाढले आहेत.

संत्रा, मोसंबी औरंगाबाद, नांदेड येथून तर लिंबू जिल्ह्यातूनच

जिल्ह्यात मोसंबी, संत्रीच्या बागा घेवून व्यापारी जिल्ह्यातच विक्री करतात. आता जिल्ह्यात फळेच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे औरंगाबाद व नांदेड येथून संत्री व मोसंबी आणली जाते. सध्या त्याच जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. लिंबू मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पुरवठा होत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

संत्री, मोसंबी, लिंबू या फळात व्हिटॅमिन सी असते. तसेच ही फळे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.

-डॉ. यशवंत पवार,

संत्री, मोसंबी, लिंबू ही फळे शक्तीवर्धक फळे आहेत. सध्या कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता या फळांचे सेवन करणे चांगले आहे. यात व्हिटॅमिन सी असल्याने शरिरासाठी फायदेशीर ठरते.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकीत्सक

इम्युनिटी वाढते ! मी फळे खातो तुम्हीही खा !!

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होत असल्याने मी नेहमी संत्रा, मोसंबी ही फळे खातो. सध्या ही फळे मिळणेच दुरापस्त झाले आहेत. दररोजच्या जेवनात मात्र लिंबू असतेच.

- समाधान भिसे

मार्च महिन्यापर्यंत संत्रा, मोसंबी ही फळे बाजारात उपलब्ध होत असल्याने खात होतो. आता मात्र फळाच्या किमती दुप्पट वाढल्या असल्या तरी फळेच उपलब्ध होत नाहीत. लिंबू मात्र आवश्य आहारात घेतो.

- नागनाथ गंगावणे

प्रतिकिलो दर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ३० ४० ५० ६०

मोसंबी ८० ९० १०० २००

संत्री ४० ७० ९० १६०