शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बिघडले वातावरण; प्रचारकांना चांगली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:44 IST

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिवसभर जोमाने प्रचार करू शकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिवसभर जोमाने प्रचार करू शकत आहेत.दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंशांच्याही पुढे जात आहे. त्याचा परिणाम म्हणून हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरत नसल्याचे दिसत आहे. गावोगाव, घरोघर भटकंती करण्यापेक्षा सर्कलच्या ठिकाणी अथवा मोठ्या गावांत सभा घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसते. त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवरच प्रचाराचा भार टाकून त्यांना वाहनांद्वारे परिसरातील गावांत पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले जात आहे. मात्र दुपारच्या वेळी ही मंडळी उन्हाच्या कडाक्यात घराबाहेर पडत नव्हती. आज मात्र ढग दाटल्याने शिरवाळी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी दुपारीही प्रचार सुरू ठेवल्याचे पहायला मिळाले.जिल्ह्यातील काही भागात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. तर हिंगोलीसह परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरीही कोसळल्या. त्याचा कोणताच फायदा होणार नसला तरीही ढगाळी वातावरणाने तापमान खाली उतरल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक