शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या बैठकीनंतरही पीककर्ज वाटप ४ टक्केच वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का वाढण्यासाठी खा.पाटील यांनी जिल्हा कचेरीत बैठक घेतली होती. यात त्यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ...

हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का वाढण्यासाठी खा.पाटील यांनी जिल्हा कचेरीत बैठक घेतली होती. यात त्यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बँकांना कडक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पीककर्ज वाटपासाठी गावनिहाय मेळाव्यांचे नियोजन करण्याचे ठरले. त्याचा कार्यक्रम महसूल प्रशासनाला सादर करायचा होता. मात्र बँकांना याचा विसर पडला. शिवाय अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी तर कायमचेच झोपेचे सोंग घेतलेले असल्याने त्यांना एकही बँक जुमानत नाही. ते ज्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधीत्व करतात तीच ११.०७ टक्क्यांवर अडकलेली आहे. बँक महाराष्ट्र २० टक्के तर सेंट्रल बॅक ऑफ इंडियाने १९.१२ टक्के असे सर्वाधिक वाटप केले आहे. यंदा महाराष्ट्र ग्रामीण बँकह ९.२५ टक्क्यांवरच अडकली. जिल्हा बँकही ३४.४९ टक्क्यांच्या पुढे सरकायला तयार नाही. त्यामुळे या बैठकीचा नेमका काय परिणाम बँकांवर झाला, हे कळायला मार्ग नाही.

दरवर्षीचीच बोंब

जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी पोटतिडकीने बैठक घेवून सूचना देतात. मात्र बँका त्यांना सोयीस्करपणे केराची टोपली दाखवितात. त्यामुळे ही दरवर्षीचीच बोंब बनली आहे. यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनालाही मात्रा सापडत नाही. एसएलबीसीकडे अशा बँकांचा अहवाल पाठविला जाईल, असा इशारा तेवढा दिला जातो. मात्र कधीच तो जात नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

कर्जमाफीनंतरही २५ हजार शेतकरी वाऱ्यावर

हिंगोली जिल्ह्यातील २५ हजार ६७६ शेतकऱ्यांना गतवर्षी कर्जमाफी झाल्यानंतरही संबंधित २० बँकांकडून त्यांना पुन्हा कर्ज मिळाले नव्हते. ते यंदा देण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र या शेतकऱ्यांना अजूनही बँका दारात उभे करायला तयार नाहीत. आतापर्यंत जिल्ह्यात २८ हजार ६३० शेतकऱ्यांना १४१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले.

बँकनिहाय झालेले कर्ज वाटप

बँक शेतकरी वाटप कर्ज उद्दिष्टाशी प्रमाण

इंडियन बॅक २८ २६.२८ ११.७७ टक्के

बडोदा बँक ११८ २१०.९५ ९.९२

बँक ऑफ इंडिया ४०२ ४२८.६३ १०.४२

बँक ऑफ महाराष्ट्र ६५० ५९०.०३ २०.८०

कॅनरा बँक ९ १०.० ०.७१

सेंट्रल बँक इंडिया १७४ १५५.८ १९.१२

पंजाब नॅशनल १७५ १४९.४ १४.१४

एसबीआय ४८१३ ४४४६ ११.०७

युको बँक ३२ ४०.३० १४.३९

युनियन बँक २७१ २४०.३ ६.८६

ॲक्सिस बँक १२ २५ २.६३

एचडीएफसी २१३ ४०६.१ ८.१२

आयसीआयसीआय १७८ २९० ७.३८

आयडीबीआय ६० ७५ १०.४२

महाराष्ट्र ग्रामीण २०६३ १५५७ ९.२५

मध्यवर्ती बँक १९४३२ ५४७६ ३४.४९