शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:20 IST

जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती.

ठळक मुद्दे एप्रिलचे वेतन होण्यासाठीच ४ जून उजाडल्याने आता मे महिन्याचे वेतन कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना एका क्लिकवर वेतन मिळेल, असे सांगून सुरू करण्यात आलेली सीएमपी प्रणालीही वेळेत वेतन अदा करण्यात कुचकामी ठरत असून, शिक्षकांना विलंबाचाच सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती. या सर्वांच्या वेतनाचे जवळपास २८ कोटी रुपये दर महिन्याला अदा करावे लागतात. ही प्रणाली आल्यानंतर वेळेत वेतन अदा होईल, ही आशा मात्र फोल ठरली आहे. मार्चचे वेतन २० मे रोजी मिळाले, तर एप्रिलचे वेतन होण्यासाठीच ४ जून उजाडल्याने आता मे महिन्याचे वेतन कधी मिळणार, असा प्रश्न पडला आहे. शासनाकडून वेतनासाठीची तरतूद प्राप्त झालेली आहे. शिक्षण विभाग व वित्त विभागाचा ताळमेळ मात्र होणे बाकी आहे. ही प्रणाली चालविण्यासाठी शिक्षण विभागाने पायाभूत माहिती सादर करणे आवश्यक असते. त्यातही वेतनामध्ये दरमहा फारसा बदल होण्याची चिन्हे नसतात. काही जणांच्याच वेतनातील बदल तेवढा केला की, या प्रणालीने वेतन अदा करणे सोपे असल्याचे सांगितले जात होते.

देयके वेळेत सादर होणे महत्त्वाचे वित्त विभागाकडे शिक्षकांच्या वेतनाची देयके ज्या दिवशी सादर होतात, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सर्व प्रक्रिया करून वेतन अदा करण्यात येते. शिक्षकांची संख्या कमी किंवा जास्त असा या प्रणालीवर कोणताच परिणाम होत नाही. फक्त देयके वेळेत सादर होणे जास्त महत्त्वाचे आहे.- मनोज पाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांना वेळेत वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्याच पद्धतीने कारभार सुरू आहे.- रामदास कावरखे, शिक्षक संघटना

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद