शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.

शेख इलियास ।लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.बँकेने त्रुटींची यादी बँकेत लावली आहे. आॅनलाईन अर्जात नावात दुरूस्ती, खाते क्रमांक आधार क्रमांक नाव बदल, कर्ज नसणारे शेतकरी, मयत आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. तालुकास्तरीय कर्जमाफी समिती शासनाने दिलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र याची छाननी करीत आहे. येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कर्जमाफीच्या अर्जाची आॅनलाईन छाननी सहाय्यक निबंधक एस.एल. बोलके, अनिल सुरदाम, राजेश बांडे, प्रल्हाद दाहिरे, डिगांबर शिंदे हे करीत आहेत. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी व ज्या शेतकºयांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी भरली नाही. अशा शेतकºयांना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेचा लाभ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज घेतलेले असावे व १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सलग दोन वर्ष कर्ज घेतलेले असावे व त्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच या योजनेचा लाभ शेतकºयांना कर्ज माफीसाठी होणार आहे. या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के अथवा १५ ते २५ हजारांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पुनर्गठण कर्जमाफीसाठी ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज थकीत असावे, ३१ जुन २०१६ पर्यंत अथवा त्यानंतर पुनर्गठण केलेले असावे तरच दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे.निकषानुसार फक्त १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्रुटीतील आॅनलाईन अर्जापैकी फक्त ५ ते १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफी व्हावी, यासाठी शेतकºयांनी जीवाचा आटापिटा करून आॅनलाईन अर्ज भरले होते. काही प्रमाणात शेतकरी शांत झाले होते. मात्र बँकेत लावलेल्या त्रुट्याच्या यादीने पुन्हा शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी बँकेत धाव घेऊन त्रुटीची यादी दोन दोन वेळेस पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची गर्दी होत आहे.