शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरने नोकरी सोडून बनवलेल्या स्वयंचलित पेरणीयंत्राचा सर्वत्र बोलबाला; परराज्यांतूनही होतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:43 IST

मजूर मिळत नसल्याच्या समस्येवर यंत्राने केली मात

ठळक मुद्दे पहिल्यावर्षी शेकड्याच्या आत विक्री होणारे यंत्र यंदा ५ हजारांवर गेले आहेत. नोंदणीनंतर त्यांना चार ते पाच दिवसात हे पेरणीयंत्र मिळत आहे.

- अरुण चव्हाण 

जवळा बाजार (हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एका तरुणाने इंजिनिअरची नोकरी सोडून स्वयंचलित पेरणीयंत्रासह विविध शेती उपकरणे तयार करण्याचा उद्योग उभारला. यातील स्वयंचलित पेरणीयंत्रामुळे मजूर लावायची झंझट दूर होत आहे. यामुळे हे यंत्र परराज्यातही पसंतीला उतरले असून मागणी वाढली आहे.

जवळा बाजार येथील गजानन लिंबाराव तिडके याने १९९४ साली इंजिनीअरिंगची पदवी घेऊन औरंगाबादेतील एका कंपनीत नोकरी पत्करली. मात्र त्यात मन रमत नसल्यामुळे १९९७ साली सेनगाव येथे मशिनरीचे छोटेसे दुकान सुरु करुन व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने जवळाबाजार येथे एक मशिनरी शोरूम उभारले. त्यात ठिबक सिंचन, विद्युत मोटार, पाईप, तूषार सिंचनासह शेती अवजारे व शेतउपयोगी साहित्याचे  दुकान टाकून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र यामध्येही त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्याने २००४ साली बाराशिव हनुमान साखर कारखाना परिसरात असोला शिवारात ट्रॅक्टर व बैलांवरील स्वयंचलित पेरणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर तसेच शेतीचे विविध अवजारे बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्याला परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

थोड्याच कालावधीमध्ये या उद्योगाने मोठी उभारी घेतली. पहिल्यावर्षी शेकड्याच्या आत विक्री होणारे यंत्र यंदा ५ हजारांवर गेले आहेत. यात स्वंयचलित बैलजोडी पेरणी यंत्राला शेतकऱ्यांतून चांगली मागणी आहे. ते १३ ते १४ हजारांना मिळते. शिवाय मिनी ट्रॅक्टरवरील यंत्रही त्यांनी बनसविले आहे. जवळा बाजारसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यांमध्ये या स्वंयचलित पेरणी यंत्राला मोठी मागणी आहे. सध्या शेतकरी पेरणीयंत्रासाठी नोंदणी करत आहेत. नोंदणीनंतर त्यांना चार ते पाच दिवसात हे पेरणीयंत्र मिळत आहे. याबाबत तिडके म्हणाले, शेतीत काम करण्याचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना नेमके कसे यंत्र असायला पाहिजे. त्याला कोणत्या समस्या येतात व त्या न येण्यासाठी यंत्रात काय काळजी घेतली पाहिजे, याचा विचार केला. त्यामुळे ते शेतकऱ्यांना पसंत पडत असावे. 

कंपनीला आएसओ नामांकन मिळालेया  पेरणीयंत्र कंपनीला आएसओ नामांकन मिळाले असून त्यामुळे शेतकरी या यंत्राला मोठी मागणी करत आहेत. या तरुणाने या उद्योगांमध्ये स्वत:सह १४ कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे.  शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीत पेरणीयंत्र तयार करून मिळत आहे. या यंत्राला शेतकरी एप्रिल महिन्यापासून मागणी करत आहेत. या उद्योगासाठी लागणारे साहित्य मुंबई व नागपूरहून मागविण्यात येत आहे. या यंत्रामुळे या परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायामुळे तरुणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र