शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनसाठी खोदले रस्ते; दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:00 IST

वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरती दुर्दशा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरती दुर्दशा झाली आहे.शहरात पाईपलाईन अंथरली जाणार हे माहित असतानादेखील नगरपालिकेने गल्लोगल्ली पेवर ब्लॉकच्या रस्त्यांसाठी शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा केला. गुत्तेदारांनी बिले उचलली. अनेक भागात पेवर बलॉकचे रस्ते झाले. आता नियोजित पाईपलाईनसाठी नव्याने झालेले रस्ते पुन्हा खोदल्या जात आहेत. काही भागात तर खोदलेल्या रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. या प्रकाराकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही. असा अजब कारभार पहावयास मिळत आहे. रस्ते खोदताना कोणीही तांत्रिक माहिती असलेले अधिकारी हजर राहत नाहीत. मजुरच वाटेल तसे खोदकाम करत आहेत. मजुरच पाईपलाईन पुरतात व निघून जातात. खोदलेले रस्ते पूर्ववत करावे लागतात याचाच नगरपालिकेला विसर पडलेला दिसतो. पाईपलाईनचे काम करणाऱ्या गुत्तेदाराकडे रस्ते पूर्ववत करुन देण्याचे काम अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही. वसमत शहरातील गल्लीबोळात पाईपलाईन होणार हे माहीत असतानादेखील रस्ते का केले? आता रस्त्याची तोडफोड होत असल्याने हा निधी वाया गेल्याने याला जबाबदार कोण, याची चौकशी कराण्याची सध्या मागणी नागरिकांतून केली जात आहे. मात्र नगरपालिकेच्या या अजब कारभाराची चौकशी करणारी यंत्रणाच अस्तीत्वात नसल्याचे चित्र आहे.पेव्हर ब्लॉक रस्ते तयार करुन गुत्तेदाराची बिले काढली. आता पुन्हा पेवर ब्लॉकची रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्या जात असल्याने पेव्हरब्लॉकची दुरवस्था झाली. आता पुन्हा रस्त्यावर पेव्हरब्लॉक राहणार की खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिका