शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:33 IST

शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंबाल बचावले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंबाल बचावले.याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी महसूल पथकासह खानापूर चित्ता येथून येणाºया एका ट्रॅक्टरचालकाला खटकाळी बायपास भागात थांबवून चौकशी केली. ट्रॅक्टरमध्ये वाळू असल्याने वाहतूक परवान्याची मागणी खेडेकर यांनी वाहनचालक हरी विठ्ठल पाचपुते यांच्याकडे केली. मात्र परवाना नसल्याने वाहन थांबविले. ट्रॅक्टर चालकाने मालक प्रवीण जाधव यांना फोन करून बोलावून घेतले. त्याच्याकडेही परवाना नसल्याने खेडेकर यांनी ट्रॅक्टर हिंगोली तहसीलला जमा करण्यास सांगितले. त्यानंतर खेडेकर शासकीय वाहनात जावून बसले. तेव्हा ट्रॅक्टर मालकाने चालकासह ट्रॅक्टरवर बसून खेडेकर यांच्या शासकीय वाहनाला जबर धडक दिली. प्रसंगावधान राखून खेडेकर वाहनातून खाली उतरल्याने बालंबाल बचावले. या पथकामध्ये तलाठी सय्यद अब्दुल कारवाडी, तलाठी प्रदीप इंगोले कन्हेरगाव नाका, वाहन चालक मारोती सिरसाठ यांचा समावेश होता. खेडेकर यांच्या वाहन क्रमांक एमएच ३८ जी २९८ चे ५0 हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक सातपुते व मालक प्रवीण जाधवसह अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीAccidentअपघात