शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टकार्डअभावी मुलींना नॅपकीन मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:36 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. योजनेचा शुभारंभही झाला. ग्रा. पं. स्तरावरून शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे झाला. कुरूंद्यात जवळपास ११० मुलींच्या नावांची नोंदणी झाली. ग्रामीण भागातील शाळेतील मुलींचा सर्व्हे झाला. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यावरच शाळेकरी मुलींना ५ रुपयांमध्ये नॅपकीन दिल्या जातील.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. योजनेचा शुभारंभही झाला. ग्रा. पं. स्तरावरून शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे झाला. कुरूंद्यात जवळपास ११० मुलींच्या नावांची नोंदणी झाली. ग्रामीण भागातील शाळेतील मुलींचा सर्व्हे झाला. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यावरच शाळेकरी मुलींना ५ रुपयांमध्ये नॅपकीन दिल्या जातील.आंतरराष्टÑीय महिला दिनाचे औचित्य साधून मार्च महिन्यामध्ये अस्मिता योजनेचा शुभारंभ महाराष्टÑ सरकारने केला आहे. या योजनेचा वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शुभारंभ झाला असून, नॅपकीन बचतगटांकडे आता उपलब्ध झालेले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे करून नाव नोंदणी करून त्यांना स्मार्टकार्ड दिल्या जार्ईल. त्यावर दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या नॅपकिनची नोंदणी करण्यात येणार येईल. बाजारपेठेमध्ये सॅनिटरी पॅड कमीत कमी ३० रुपयांमध्ये मिळते. बाजारपेठेमध्ये दर पाहता सवलतीच्या दरामध्ये शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना ५ रुपयांत नॅपकीन मिळणार आहे. तर १९ वयोगटाच्या पुढील महिलांना नॅपकीन १८ रुपयांच्या दरामध्ये दिल्या जाईल. त्यांनाही बचतगटाकडे नोंदणी करावी लागेल. नॅपकीन विक्री व वाटपाचे काम महिला बचत गटांना दिल्या जाणार आहे. बचत गटाच्या ठिकाणावरून हे नॅपकीन घ्यावे लागणार आहे. महिला बचत गटाला रोजगार उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्याकडे हे काम सोपविले आहे. स्मार्टकार्ड उपलब्ध झालेले नसल्याने नॅपकीन मिळताना दिसत नाहीत. सर्व्हे झाले, नॅपकीन आले. मात्र स्मार्ट कार्ड देण्यासाठी संबंधित विभागाने तत्परता दाखवलेली दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट कार्डची प्रतीक्षा करावी लागत आहे.स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यानंतर ५ रुपयांमध्ये नॅपकीन मुलींना मिळणार की, या कार्डची प्रतीक्षा करण्यातच आणखी काही वर्षे वाया जाणार? हा गंभीर प्रश्न आहे. यावर सध्या कुणीच बोलतही नाही.महिला बचत गटांमार्फत वाटपजिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. तर महिलांनादेखील योजनेतून १८ रुपयांमध्ये नॅपकीन बचत गटाच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर शाळेतील मुलींचा सर्वे करून स्मार्टकार्ड दिल्या जाणार व दर महिन्याला ५ रुपयांत स्मार्टकार्डवर नोंदणी करून नॅपकीन बचतगट वाटप करणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स