शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:39 IST

गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात आली.जी कामे जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला करणे शक्य नाही, ती टंचाईतून करण्याचा ट्रेंड निर्माण झाला होता. त्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांमधून सरपंच मंडळीही जोरदार आवाज उठवायची. खरेतर अशा अनेक गावांत टंचाईचे उग्र रुपही होते. मात्र गतवर्षी केलेले उपाय वर्षभरातच निकामी होऊन पुढल्या वर्षी पुन्हा पदर पसरणार असाल तर शासनाने नाहक अशा किती उपाययोजना करायच्या? असा प्रश्न जिल्हाधिकाºयांनी उपस्थित करून यावर पाणी फेरले. तर कालावधी कमी उरला अन् बोअरपेक्षा अधिग्रहणाचा खर्च कमी येत असेल तर तसा उपाय करण्यात आला. खर्च बचतीच्या या फंड्यापुढे अनेकांचे टंचाईचे अवाजवी प्रस्ताव तसेच धूळ खात पडून राहिले, हे विशेष.हिंगोली जिल्ह्यातून बोअरसाठी १७२ प्रस्ताव आले होते. यापैकी ८२ प्रस्तावांना जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली. यात वसमत-९, कळमनुरी-१५, हिंगोली-२२, औंढा नागनाथ-१५, सेनगावातील २१ गावांत बोअर घेण्यास मंजुरी दिली आहे. कुठे एक तर कुठे दोन बोअर आहेत. तर ६९ प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविले होते. त्यातील अनेक ठिकाणी पूर्वीच्या उपायांची निगा नसल्याने टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे आढळले.यंदा मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या २१ वर पोहोचली होती. १९ गावे, ४ वाड्यांसाठी ५ शासकीय व १६ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसाकाठी ३६ खेपा मंजूर होत्या. हिंगोली-४, कळमनुरी -८, सेनगाव- ६, औंढा-३ अशी मंजूर टँकरची तालुकानिहाय संख्या आहे. तर खाजगी विहीर/बोअर अधिग्रहणांची संख्याही आता २७१ वर पोहोचली आहे. यामध्ये २३१ गावांसाठी टँकरसह केलेल्या अधिग्रहणांची ही संख्या आहे. यात हिंगोली-३८, कळमनुरी-५२, सेनगाव-७२, वसमत-६५, औंढा नागनाथ-४४ अशी संख्या आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई