शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आदेशामुळे डॉक्टरांना रुग्णकुंडलीची डोकेदुखी

By admin | Updated: November 20, 2014 15:01 IST

एकीकडे पेन आणि पेपरलेस व्यवहार होत असताना दुसरीकडे रूग्णांची कुंडली मांडण्याची कटकट डॉक्टरांच्या मागे लागली आहे.

 हिंगोली : एकीकडे पेन आणि पेपरलेस व्यवहार होत असताना दुसरीकडे रूग्णांची कुंडली मांडण्याची कटकट डॉक्टरांच्या मागे लागली आहे. आघाडी शासनाने जाता-जाता आणलेल्या नव्या जीआरनुसार रूग्णांच्या दूरध्वनी क्रमांकापासून ते मेडिकलच्या स्टँपपर्यंत लिखापडीचे काम मागे लावले. त्यात १७ मुद्यांचा समावेश असून १४ बाय २१ सेंटीमीटरच्या साईजमध्येच प्रीस्क्रक्रीपशनचा कागद ठेवण्याची सक्ती केल्याने डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे. पूर्वी रूग्ण एक, डॉक्टर दुसरा आणि रुग्णालय तिसर्‍याचेच, अशी गत होती. कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याने रूग्णांच्या जीविताच्या जबाबदरीचा प्रश्न निर्माण झाला होता. नोंदणी नसतानाही भरमसाठ मडिकलही मिळत असल्याने मुन्नाभाईची संख्याही वाढली होती. जेव्हापासून अन्न व औषधी विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार महेश झगडे यांनी घेतला. तेव्हापासून आमूलाग्र बदल होत गेले. पहिल्यांदा औषधी विक्रेत्यांना शिस्त लावल्याने बरेच वादंग निर्माण झाले. मेडिकलनंतर आता डॉक्टरांवर मोर्चा वळवला आहे. प्रामुख्याने त्यात आघाडी शासनाने जाता, जाता अनेक निर्णयघेतले. नुकत्याच आलेल्या एका जीआरने डॉक्टरांना ताप आणला. त्यात रूग्णांची आरोग्य पत्रिका डॉक्टरांना तयार करण्याची सक्ती केली. तब्बल १७ प्रश्नांची उत्तरे स्वत: लिहावे लागणार आहेत. पहिल्यांदा डॉक्टरांचे नाव, पत्ता, शिक्षण, नोंदणी क्रमांक, दूरध्वनी, ईमेल लिहिणे अपेक्षित आहे; परंतु लेटरपॅडच्या माध्यमातून या कटकटी होणार नसल्या तरी प्राव्हेट प्रॅक्टीसनर्सची पंचायत होणार आहे. याहीपेक्षा रूग्णांचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी, लिंग, वय, वजन, औषधींचे नाव, औषधींचे जनरीक नाव (कॅपिटल लेटर्समध्ये), रूग्णांची क्षमता, डोसचा फॉर्म, सूचना, कालावधी आणि प्रमाण, रूग्णांच्या आवडीप्रमाणे एखादे जनेरीक औषधी तर शवेटी डॉक्टरांचे सही व शिक्क्यानिशी तारखेचाही उल्लेख करावा लागेल. तरीही औषधी दुकानांचा पत्ता व रूग्णांना औषधी दिलेल्या तारीखेचाही उल्लेख विक्रेत्यांना करावा लागणार आहे. एवढय़ावर हा विषय थांबत नसून या सूचनांचा अतंर्भाव असलेल्या प्रीस्क्रीपशनची साईज १४ बाय २१ सेंटी मिटरमध्ये ठेवावी लागणार आहे. दोन दिवसांपासून हा जीआर जिल्ह्यातील एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांना दिला जात आहे. लवकरच त्याची अंमलबजाणी डॉक्टरांना करावी लागणार आहे. आघाडी शासनाच्या काळातच हा निर्णय झाला. त्याची आता अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार डॉक्टरांनी या बाबी लिहिणे अपेक्षित आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी प्रतिक्रिया अन्न व औषधी इन्सपेक्टर अरूण गोडसे यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)