शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:01 IST

ज्या संसर्गितांना दुस-या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत. 

हिंगोली :  लॉकडाऊनमुळे एचआयव्ही संसर्गितांच्या औषधीमध्ये खंड पडू नये, याची खबदारी घेतली जात असून आता या रूग्णांना जवळील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातच औषधी वाटप केली जाणार आहे. त्यामुळे एचआयव्ही संसर्गितांना औषधी घेण्यासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयाच्या एआरटी केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही.

एमएसएसीएस मुंबई आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालया तर्फे हा स्वागताह निर्णय घेतला आहे. एचआयव्ही, एड्स रुग्णांसाठी  हिंगोली जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात औषधी घेणाºया संसर्गितांना ‘लॉकडाऊन’ च्या काळात जिल्ह्याच्या एआरटी केंद्राकडे येणे शक्य नसल्याने त्यांना त्यांच्या घराशेजारी सोयीच्या ठिकाणी औषधी पुरविण्याचा निर्णय  एमएसएसीएस मुंबई आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांनी हा निर्णय घेतला आहे.

सर्व एचआयव्ही संसर्गितांनी औषध घेण्यात खंड पडू देऊन नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी केले आहे. ज्या रुग्णालयात औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यांचे नावे व त्या ठिकाणच्या आयसीटीसी कर्मचाºयांचा मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे आहेत. सकाळी १० ते १ या वेळेत रूग्णांना मोफत औषधी वाटप केली जाईल. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय, कर्मचारी पवन इंगोले यांचा मोबाईल क्रमांक ९७६७०२३८३८, तसेच वसमत उपजिल्हा रुग्णालय सुमित्रनंदन सावंत, मोबाईल क्रमांक ८८५६०५२४८०, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय, आनंद चारण मोबाईल क्रमांक ८१४९८०३०१२, सेनगाव ग्रामीण रुग्णालय किशोर वानखेडे, ९३२५०२४५५३ तसेच आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालय, कर्मचारी चंद्रकांत कोलते आदी कर्मचाºयांसोबत रूग्णांनी संपर्क साधून औषधी घेऊन जावीत. असे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्या संसर्गितांना दुसºया टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत. 

एआरटीकार्ड आवश्यकचजिल्ह्यात सध्या १७०० च्या जवळपास एचआयव्ही संसर्गित रूग्ण आहेत. जवळील रूग्णालयातून औषधी घेऊन जाताना सोबत एआरटीकार्ड नेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रूग्णांनी याची खबदारी घ्यावी व कार्डसोबत घेऊन जावे असे जिल्हा सामान्य रूग्णालय हिंगोली तर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्सmedicineऔषधंHingoliहिंगोली