शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:32 IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्य मागास आयोगाचे सदस्य आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी निवेदने देण्यासाठी एकच गर्दी केली होती. यात मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे, याबाबतच्या निवेदनांचा समावेश होता. तर काहींनी विदर्भातील मराठा कुणबींशी असलेल्या रोटी-बेटीच्या व्यवहाराचा दाखला दिला. या आयोगासमोर निवेदने देण्यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतरही अनेक पक्षांची मंडळी आल्याचे दिसून येत होते. मराठा समाजातील विविध संघटनासह इतरही अनेक संघटनांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निवेदने सादर केली. या ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक ग्रामपंचायतींनीही ठराव आणले होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, संघटना, सेवाभावी संघटनांनीही निवेदने दिली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अनेकांनी संघटनांसह वैयक्तिक पातळीवरही निवेदने दिली. त्यामुळे हजारो निवेदने आल्याचे दिसून येत होते. यात जि.प.सदस्य, नगरसेवक, रिपाइं आठवले गट, भीमशक्ती, मराठा शिवसैनिक सेना, रासप यांच्या वतीनेही शिष्टमंडळाद्वारे निवेदने दिली जातअसल्याचे दिसून आले. तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, युवा प्रतिष्ठान आदींनी निवेदने तर दिलीच; शिवाय पदाधिकारी, कार्यकर्तेही निवेदकर्त्यांना नोंदणीसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते. दिवसभर ही मंडळी कार्यरत होती.आयोगाचे सदस्य डॉ.सर्जेराव निमसे, डॉ.राजाभाऊ करपे यांच्यासमक्ष अनेक महिलांनीही आपली मते मांडून निवेदने सादर केली. अनेक ग्रामपंचायतींतर्फेही ठराव आले होते.