शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाचाच पाणवठा कोरडा; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:07 IST

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक रोडवरील वन विभाग कार्यालयात तयार केलेल्या पानवठ्यातही पाण्याचा एकही थेंब टाकलेला नसेल तर जंगली भागातील पानवठ्याची काय स्थिती असेल? हे यावरुनच लक्षात येते. सध्या एवढे ऊन तापत आहे. दुपारनंतर पाण्याने जिवाची लाही-लाही होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंतीशिवाय पर्यायच नाही. अन् एकीकडे मात्र वन विभाग जंगलात पाणी असल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक पाहता पाण्यासाठी भटकंती करणारे अनेक प्राणी कोरड्या विहिरीत तर कधी पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष करुन रोहि हा प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तर रस्त्यावरही अनेकदा वाहनाला धडकला आहे. त्यामुळे जंगली भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करुन ठेवणे नितांत गरजेचे असतानाही वन विभागाकडून तसे मात्र अजिबात होत नाही. त्यातच जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी असलेल्या मोठ- मोठ्या तलावातून रात्री - अपरात्री पाणी उपसा सुरु असल्याने त्याही तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गेलेले वन्यप्राणी गाळात रुतून मृत पावत आहेत.सध्यास्थितीत जंगली भागातील पानवठे पूर्णत: कोरडे झाल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी कधी अपघातात तर कधी विहिरीत पडून मृत झाले आहेत. शिवाय, रस्ता ओलांडताना अनेकदा दुचाकीची धडक वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे. तर यासंदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या तरी जंगली भागातील पाणीसाठे कोरडे झालेले नाहीत. आम्ही नियमित पाहणी करत आहोत. मात्र १ एप्रिलपासून पानवठ्यात पाणी सोडले जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणीTemperatureतापमान