शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट दुचाकी अडवल्याने मद्यपी तरुणांची वाहतूक पोलिसास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:38 IST

तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे

हिंगोली : सुसाट दुचाकी अडवल्याने मद्यपी तरुणांनी वाहतूक पोलिसास दमदाटी करून मारहाण केल्याची घटना बुधवारी ( दि. २६ ) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा तिघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरातील रेल्वेगेट परिसरातून दुचाकी सुसाट वेगाने धावत होती. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या हिंगोली वाहतुक शाखेचे कर्मचारी पोहेकाँ गजानन महादजी सांगळे यांनी दुचाकीस अडवले. यानंतर दुचाकीचालक नितीन किसनराव कवडे याची त्यांनी चौकशी केली. यावेळी सांगळे यांनी ब्रेथअनालाझर मशिनने सदर दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे आढळुन आले. 

दरम्यान, दुचाकीचालक कवडे व त्यांचे दोन साथीदारांनी सांगळे यांच्यासोबत वाद घालणे सुरु केले. तसेच दमदाटी करून जबर मारहाण केली. याप्रकरणी गजानन  सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन किसनराव कवडे, राधेशाम विठ्ठल हरण, कमळाजी प्रल्हादराव हरण या तिघांविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसHingoliहिंगोली