शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट

By रमेश वाबळे | Updated: January 2, 2024 16:09 IST

ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे  टँकर येवू शकले नाही.

हिंगोली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक-  टँकरचालकांनी आंदोलन पुकारले असून, यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, इंडेन गॅस बाॅटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टॅंकरचालक सहभागी झाले आहेत. परिणामी, जिल्ह्यातील ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट झाला आहे. तर उर्वरित पंपातील इंधनसाठाही सायंकाळपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे  टँकर येवू शकले नाही. त्यामुळे पंपांवर इंधनसाठा होऊ शकला नाही. तर जो काही शिल्लक साठा होता तो विक्री करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ५१ पैकी १५ च्या वर पंपांवर पेट्रोल, डिझेलचा दुपारनंतर ठणठणाट झाला. हिंगोली शहरातील पोलिस प्रशासनाच्या पंपावर तर सकाळी १० वाजताच पेट्रोल संपले होते. तसेच इतर पंपांवरही साठा कमी असल्यामुळे दुपारनंतर पंपचालकांकडूनही वाहनांमध्ये इंधन भरताना हात आखडता घेण्यात येत होता. कुणी ५०० रूपयांच्या पेट्रोलची मागणी केली तर त्याला १०० ते २०० रूपयांचेच दिले जात होते.

ग्रामीण भागात लूट...पंपांवरून कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल नेऊन ग्रामीण भागातील किराणा, पंक्चरच्या दुकानात विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी अवैधमार्गाने इंधन विक्री होते. मात्र, कारवाईचे कर्तव्य कुणी बजावत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्रामीण भागातील किराणा, पंक्चर, पानपट्ट्यांवर सर्रासपणे पेट्रोलची विक्री होते. सध्याच्या परिस्थितीत दिडशे ते दोनशे रूपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPetrol Pumpपेट्रोल पंप