शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हिंगोली आगाराच्या बस चालकावर श्वानाचा हल्ला, सेनगाव तालुक्यातील जयूपर येथील घटना

By रमेश वाबळे | Updated: March 19, 2023 12:33 IST

जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.

हिंगोली : मुक्कामी एसटी बसफेरी घेवून गेलेल्या चालकावर श्वानाने हल्ला केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे १९ मार्च रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. श्वानाने चालकाच्या पायाला, पाठीला चावा घेतला असून, जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले.

हिंगोली एसटी आगारात कार्यरत राहुल किसन पाटील (चालक क्र.६०२) व वाहक सिताराम यादव १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता हिंगोली- जयपूर मुक्कामी बसफेरी करण्यासाठी गेले होते. १९ मार्चच्या पहाटे ५ च्या सुमारास राहुल पाटील शौचालयात जात असताना एका श्वानाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या पायाला, पाठीला श्वानाने चावा घेतला. यामध्ये अंगावरील कपडेही फाटले. अशा स्थितीत त्यांनी जयपूर येथून प्रवासी घेत बस कौठा येथे आणली. या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर बस हिंगोली आगारात आणल्यानंतर त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, ग्रामीण भागात मुक्कामी बस फेरीसाठी जाणाऱ्या चालक, वाहकांना रात्र एसटी बसमध्येच काढावी लागते. त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसते. त्यामुळे एसटी चालक, वाहकात नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली