शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रेल्वेने दुसऱ्या राज्यांमध्ये जाताय का? आधी कोरोनाची टेस्ट करुन घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली: महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जायचे झाल्यास कोरोना चाचणी आवश्यक असून तसे केंद्राने कळविले आहे. परंतु, काही प्रवासी अजूनही कोरोना ...

हिंगोली: महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जायचे झाल्यास कोरोना चाचणी आवश्यक असून तसे केंद्राने कळविले आहे. परंतु, काही प्रवासी अजूनही कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. कोरोना तपासणीबाबत रेल्वे विभाग प्रवाशांना विचारणा करीत असल्याचे सांगण्यात आले.

गत महिनाभरापासून रेल्वेची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिसरी लाट समोर असून प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत, परंतु काही प्रवासी मास्क न घालताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, त्या प्रवाशांना रेल्वेने नियुक्त केलेले पथक दंडही लावत आहेत. महाराष्ट्रातून इतर राज्यात जायचे झाल्यास कोरोना महामारीची तपासणी करणे अनिवार्य आहे, असे केंद्राने कळविले आहे. तिकीट काढतेवेळेस रेल्वे विभागही कोरोना तपासणी केली आहे का? याची विचारणा करीत आहे.

सध्या सुरु असलेल्या रेल्वे

नांदेड ते अमृतसर

नांदेड ते गंगानगर,

अमरावती ते तिरुपती

नरखेड ते काचीगुडा

या रेल्वे कधी सुरु होणार ?

अमरावती ते पुणे, अजनी कुर्ला

पॅसेंजर रेल्वेबाबत अजून काही सूचना आलेली नाही. रेल्वे विभागाची सूचना आल्यास प्रवाशांसाठी पॅसेंजर सुरु केली जाणार आहे.

कोरोना टेस्टबाबत विचारणा केली जात आहे

महाराष्ट्रातून इतर राज्यात साधे तिकीट किंवा आरक्षण तिकीट काढून कोणी जात असेल तर त्या प्रवाशांना तिकीट काढतेवेळेस ‘कोरोना तपासणी केली आहे का? तपासणी प्रमाणपत्र आहे का? याची विचारणा केली जात आहे, असे रेल्वे विभागाने सांगितले.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला आरक्षण मिळू लागले

कोरोना महामारीचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे पाहून प्रवाशांनी मोठ्या शहरात जाणे बंद केले होते. कोरोनाची तिसरी लाट समोर ठेवून प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्यातरी प्रवाशांना आरक्षणही मिळू लागले आहे.

कोरोना कमी झाला असून रुग्णही कमी आढळून येत आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालूनच प्रवास करावा. जे प्रवासी मास्क घालणार नाहीत, त्यांना नियमाप्रमाणे दंडही भरावा लागणार आहे.

- रामसिंग मीना, स्टेशन मास्टर, हिंगोली