शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हिंगोली डीपीसीच्या बैठकीत दुष्काळावरील चर्चा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:56 AM

जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१ कोटी ४१ लाखांच्या प्रारुप आराखड्यास नियोजन समितीच्या बैठकीत १३ जानेवारी रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. मात्र यावेळी सदस्यांनी दुष्काळावरून प्रशासन व मंत्र्यांना घेरत चांगलेच धारेवर धरले.

हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१ कोटी ४१ लाखांच्या प्रारुप आराखड्यास नियोजन समितीच्या बैठकीत १३ जानेवारी रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. मात्र यावेळी सदस्यांनी दुष्काळावरून प्रशासन व मंत्र्यांना घेरत चांगलेच धारेवर धरले.नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, आ. डॉ. संतोष टारफे, आ. रामराव वडकुते, आ. विप्लव बजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार आदी उपस्थित होते.यावेळी खा.सातव, आ.मुटकुळे, आ.वडकुते यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून रान उठविले. खरोखर दुष्काळ असतानाही दुष्काळ का जाहीर होत नाही, असा सवाल केला. त्यावर प्रस्ताव पाठविल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तर आणेवारी जास्त दाखविल्यावर विमा कसा मिळेल, असा सवाल केल्यावर इतर निकष पूर्ण होत असल्याने पीकविमा मिळेल असे जयवंशी यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करून उपायही होतील, असे सांगितले.२०१९-२० अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता ९८ कोटी ७४ लाख तर अनुसूचित जाती उपयोजनेत ५० कोटी ४७ लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत २२ कोटी २० लाख ९ हजार एकूण १७१ कोटी ४१ लाख ९ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिली. जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत डिसेंबर २०१८ अखेर झालेल्या खर्चाचाही आढावा घेतला. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ४० कोटी ८२ लाख रुपये तर अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत १५ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाला.अनुसूचित जमाती आदिवासी उपयोजनेंतर्गत १९ कोटी ९ लाख रुपये खर्च झाला आहे. यंदाच्या आराखड्यात गतवर्षीपेक्षा कमी निधी का मंजूर झाला, असा सवाल खा.सातव यांनी केला. यावेळी जि.प. सदस्य अंकुश आहेर, आखरे, मुंडे यांनी रस्ते, शाळा व उपकेंद्रांसाठी वाढीव निधीची मागणी केली. खासदार, आमदारांनीही आग्रह धरल्याने पालकमंत्र्यांनी होकार दिला. तर खा.सातव, आ.मुटकुळे यांनी महावितरणला पाच कोटी रुपयांचा जास्तीचा निधी देऊन डीपींची समस्या सोडविण्याची मागणी केली. त्याला होकार मिळाला. डॉ.अशोक बेलखोडे यांनी आरोग्य उपकेंद्रातील बाळंत कक्ष व आदर्श अंगणवाड्यांचे मॉडेल उभारण्याची मागणी केली.बैठकीस नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह पहिल्यांदाच अशासकीय सदस्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले. या सदस्यांचा यावेळी रोपटे देऊन सत्कारही करण्यात आला....तर गटशिक्षणाधिकारी निलंबित कराडॉ.सतीश पाचपुते यांनी जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू झाले नसल्याचा मुद्दा मांडला. यावर गटशिक्षणाधिकारी प्रस्ताव पाठवत नसल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. जर बीईओंनी दिरंगाई केली तर निलंबनाचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यात आढावा घेऊन प्रश्न निकाली काढू, असे सांगितले.सातवांची गांधीगिरीनियोजन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे खा.राजीव सातव यांनाच मंचावर बसायला जागा नव्हती. सातव उशिराने आल्यानंतर अशी व्यवस्था होण्याची चिन्हे दिसत नसल्याने ते थेट समोर सदस्यांसमवेत जावून बसले. नंतर त्यांना जागा दिली. शिवाय पत्रकारांसह इतरांना बाहेर जाण्याची नियोजन अधिकाºयांची विनंती भाजप व सेना कार्यकर्त्यांनी धुडकावत सभागृह सोडले नाही. त्यामुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद