शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:21 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केले. या बैठकीस जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जकी कुरेशी, सुरेशअप्पा सराफ, विनायक देशमुख, शंकरराव कºहाळे, बापुराव बांगर, धनंजय पाटील, मधु जामठीकर, रमेश जाधव, डॉ.क्यातमवार, शेख नेहाल आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना खा.राजीव सातव पुढे म्हणाले की, देशभरात भाजपा सरकार विरोधात जनमत संघटित होत असल्याने दिवसेंदिवस काँग्रेसचे पाठबळ वाढत आहे. या काळात काँग्रेस पदाधिकाºयांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, आगामी काळात दुष्काळात जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही सातव म्हणाले. सूत्रसंचालन गोरख पानपट्टे यांनी केले.कामाला लागा -मुंडेलोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे. जिल्ह्यात प्रत्येक पदाधिकाºयांनी आपले लक्ष बुथभोवती केंद्रित करून बुथवर पक्षाचे मताधिक्य कसे वाढेल, यासाठी मोर्चेबांधणी करावी, असे आवाहन हिंगोली जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस