शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

औंढा तीर्थक्षेत्र आराखड्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:49 IST

औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे.मागील अनेक दिवसांपासून औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी दोनदा मंत्रालय स्तरापर्यंत जावूनही विविध त्रुटी काढल्याने आराखडा माघारी पाठविण्यात आला. यावेळी या आराखड्यावर बारकाईने काम केले जात आहे. या आराखड्यातील विकास कामांचे प्रस्ताव काटेकोर तपासणी करून तयार करण्यात आले आहेत. यावर लवकरच मुख्य सचिवांसमोर बैठक होणार आहे. या आराखड्यात पहिल्या टप्प्यात २५ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३५ कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे. यात विविध सुधारणांच्या सूचना देत या आराखड्याच्या प्रारुपाचे अंतिमीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिल्या. या आराखड्यात प्रसादालय, भक्तनिवास, मंदिर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, मंदिरानजीक व्यापारी संकुल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महादेव वन, हरिहर तलाव सुशोभिकरण, घाटाचे बांधकाम आदी कामे करण्यात आली आहेत.या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, पोलीस उपाधीक्षक सुजाता पाटील, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपअभियंता लोखंडे, आरेखक देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlanning Commissionनियोजन आयोग