शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

‘टीईटी’ परीक्षेपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:17 IST

शहरातील सरजूदेवी विद्यालयासह माणिक स्मारक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच गेट बंद करून प्रवेश नाकारल्याने संतप्त जवळपास १०० विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रास्ता रोको आंदोलन केले. वेळेत पोहोचूनही आम्हाला परीक्षेस बसू दिले दिले नाही, असा काही विद्यार्थ्यांनी यावेळी आरोप केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील सरजूदेवी विद्यालयासह माणिक स्मारक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच गेट बंद करून प्रवेश नाकारल्याने संतप्त जवळपास १०० विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रास्ता रोको आंदोलन केले. वेळेत पोहोचूनही आम्हाला परीक्षेस बसू दिले दिले नाही, असा काही विद्यार्थ्यांनी यावेळी आरोप केला.जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळ व दुपार सत्रात होणाऱ्या परीक्षेसाठी २१६७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले. मात्र रविवारी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत आले नाहीत, म्हणून केंद्रप्रमुखांनी या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. जिल्ह्यातील ७ केंद्रावरून रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. सकाळ सत्राचा टीईटी पेपर सकाळी १०.३० वाजता होता. परंतु परीक्षा केंद्रात उशिराने पोहोचल्याने आम्हाला परीक्षेला बसू दिले नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी संतप्त परीक्षार्थ्यांनी थेट जिल्हा कचेरीकडे मोर्चा वळविला. कचेरीसमोर घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प होती. घटनास्थळी लगेच पोलीस अधिकारी दाखल झाले. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे यांनी परीक्षार्थ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. व जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व परीक्षेशी संबंधित अधिकाºयांशी दूरध्वनीवर संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्याची विनंती केली. परंतु विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिराने पोहोचल्याने आता परीक्षेची वेळ निघून गेली आहे, त्यांना परीक्षेस बसता येणार नाही असे टारफे यांना सांगण्यात आले. परीक्षेस बसू न दिल्याने दीडशेच्या जवळपास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सकाळ सत्रात सरजूदेवी आर्य कन्या विद्यालय २८८, माणिक स्मारक विद्यालय २६४, आदर्श महाविद्यालय ३३६, आदर्श महाविद्यालय ३२५ परीक्षार्थ्यांची संख्या आहे. तर दुपार सत्रात सिक्रेटहार्ट इंग्लिश स्कूल २९१, आदर्श महाविद्यालय अ ३३६, आदर्श महाविद्यालय ब ३२७ एकूण सात केंद्रावरून २ हजार १६७ परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षेस बसणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते.आदर्श महाविद्यालय परीक्षा केंद्रावरही असाच प्रकार घडला. परीक्षेस उशीर झाल्याने त्यांना परीक्षेस बसू दिले नाही.जिल्हाधिकारी : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदपरीक्षार्थीनीं परीक्षा केंद्रात अर्धातास अगोदर येण्याच्या सूचना होत्या. शिवाय उमेदवारांच्या हॉलतिकिटांवर तशा सूचना आहेत. परीक्षा केंद्रात वीस मिनिट अगोदर येणाºया सर्वांना प्रवेश दिला. मात्र जे उशिरा परीक्षार्थी आले त्यांना नियमानुसार परीक्षेस बसू दिले नाही. असे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्केयांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षे संदर्भात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्या सूचनेप्रमाणे परीक्षेचे नियोजन केले होते.परीक्षेस २२८ गैरहजरहिंगोली शहरातील सात परीक्षा केंद्रावरून रविवारी १८९९ परीक्षार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. तर २६८ जण परीक्षेस गैरहजर होते, असे उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी सांगितले.सीसीटीव्हीत कैद उमेदवारांची वेळमहाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हिंगोलीत सकाळपासूनच परीक्षार्थींची गर्दी होत होती. परीक्षा विभागातर्फे वेळेत परीक्षेस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. परीक्षा सुरू होताच परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे शंभरापेक्षा जास्त उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. भावी शिक्षकांना परीक्षेला उशीर झाल्याने पात्रता परीक्षेस ते बसू शकले नाहीत. त्यामुळे जवळपास शंभरच्यावर उमेदवारांना पात्रता परीक्षेपासूनच वंचित रहावे लागले. तर काहींनी केवळ दोन मिनिटे उशीर झाल्याने आम्हाला परीक्षा दालनात जाऊ दिले नाही, असे सांगितले. परीक्षेस बसू न दिल्याने अन्याय झाल्याच्या भावनेतून विद्यार्थी व पालकही संतप्त झाल्याचे यावेळी दिसून आले. परंतु विद्यार्थी वेळेत आले होते की उशिराने; याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत तपासा अशी परीक्षार्थी मागणी करीत होते. अचानक परीक्षेच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थ्यांची गर्दी झाली होती. परीक्षेस बसू न दिल्याने अनेक विद्यार्थी संतप्त प्रतिक्रिया देत होते.टारफे यांची भेटविद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याची माहिती आ. डॉ. संतोष टारफे यांना मिळाली. त्यांनी थेट विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थी व आ. टारफे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. परंतु रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे प्रशासकीय अधिकाºयांची भेट झाली नाही. त्यामुळे आ. टारफे यांनी जिल्हाधिकाºयांना तसेच शिक्षणाधिकाºयांना परीक्षेस बसू देण्याची मोबाईलवरून विनंती केली. परंतु सदर विद्यार्थी परीक्षा दालनात वेळेत पोहोचले नाहीत. आता त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा