शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा प्रकरणी आला कारवाईला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:00 IST

कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली. मात्र आंदोलक अजूनही समाधानी नाहीत.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली. मात्र आंदोलक अजूनही समाधानी नाहीत.मागील काही दिवसांपासून कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील मग्रारोहयोचे प्रकरण गाजत आहे. प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी कारवाई करीत नसल्याचा आरोप आंदोलक करीत आहेत. तर प्रशासन मात्र यात शक्य तेवढी कारवाई केल्याचे सांगून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच महिना गेल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी जि.प. प्रशासनास खरमरीत पत्र दिले. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईसाठी आंदोलकांशी जि.प. प्रशासनाने चर्चा केली. त्यानंतर कारवाईचे प्रस्ताव तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. आजही जि.प.च्या प्रांगणात धानोरा येथील आंदोलक घुटमळताना दिसत होते. यात संबंधित दोषींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष्मण डुकरे व अ‍ॅड. विजय राऊत यांना दिले आहे.याबाबत बोलताना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख म्हणाले, धानोरा येथील ग्रामरोजगार सेवकास काढून टाकण्यात आले आहे. तर या गावचा ग्रामसेवक कंत्राटी असून त्याची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास ग्रामसेवकावर कारवाई होईल. तसेच कळमनुरीचा मग्रारोहयोच्या एपीओची कंत्राटी नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाल्याने त्याच्यावर संबंधित कार्यालयानेच कारवाई करावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. गटविकास अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर एका एमआयएसची रक्कम संबंधितांकडून वसूल करून मजुरांच्या खात्यावर टाकण्यास सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली