शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:16 IST

देशभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी धर्म संप्रदायाचा प्रसार व प्रचार करणारे आद्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे सुरू आहे. मंदिरात २ जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : देशभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी धर्म संप्रदायाचा प्रसार व प्रचार करणारे आद्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे सुरू आहे. मंदिरात २ जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.नर्सी येथे संत नामदेवांच्या जन्मठिकाणी कयाधू नदीच्या तिरावर मागील मागील अडीच वर्षांपासून संगमरवरी दगडाने भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता श्री संत नामदेव महाराज यांच्या पुर्वीची जूनी मूर्ती व पूर्णाकृती नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर जीर्णाेद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, आ. तानाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, आ. रामराव वडकुते, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. बळीराम कोटकर, माजी आ. दगडू गलंडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, हभप लोकश चैतन्य महाराज, हभप काशिरामबुवा विडोळीकर, आत्मानंद महाराज गिरीकर, नारायण खेडकर, अ‍ॅड. के. के. शिंदे, माधवराव पवार, भानुदास जाधव, नगरसेवक गणेश बांगर, बाजीराव इंगोले, दाजीबा पाटील, सतीश विडोळकर, शाहूराव देशमुख, विठ्ठल वाशिमकर, गिरीश वरूडकर, विलास कानडे आदी उपस्थित होते.बुधवारी सकाळी ९ वाजता श्रींच्या दोन्ही मूर्तींची पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातारवणामध्ये दुग्धाभिषेक होमहवन व मंत्रोपचाराने, संत नामदेव महाराज यांच्या जयघोषाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी सकाळपासूनच नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविक मंदिर परिसरात एकत्र जमले होते. तर दुपारी बारा वाजता हभप श्री अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक