शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

शिवशंकराच्या विवाहाला भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:21 IST

देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. श्री नागनाथ संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी उपाययोजना केल्या आहेत.

गजानन वाखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. श्री नागनाथ संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी उपाययोजना केल्या आहेत.देशामध्ये १२ ज्योतिर्लिंगापैकी औंढा हे आठवे ज्योतिर्लिंग आहे. यामध्ये रामेश्वर व औंढ्यातील नागेश्वर येथील दोन्ही शिवलिंंग वाळूने अच्छादलेले आहे. पांडव काळात या ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले असून हे शिवलिंग स्वयंभू आहे. या दोन्ही ठिकाणी शिवलिंग स्पर्श करून दर्शन घेण्याची प्रथा आहे. तशी व्यवस्था अन्य ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आढळून येत नाही. पांडव काळात विशाल मंदिर ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधल्याची अख्यायिका आहे. आर्धे मंदिर हेमांडपंथी बांधकामात असून, पाच दिवसाचा असतो. शनिवारी या उत्सवाची सांगता शिवशंकर व पार्वती यांना रथामध्ये बसवून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर होते. यालाच रथोत्सव म्हणतात.मंदिरात जाण्या व येण्याचा एकच मार्ग असल्याने संस्थानच्या वतीने बॅरेकेटेस बांधली आहेत. दर्शन गाभाºयात जाऊन घ्यावे लागत असल्याने दर्शनाला २ ते ३ तास लागतात. अशा वेळी दिव्यांग, आजारी व वृद्ध भाविकांना शिखर दर्शन घेऊनच समाधान मानावे लागेल. मध्यरात्रीपासूनच भाविकांसाठी दर्शन व्यवस्था खुली केली जाणार आहे. महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी गुजरात, राजस्थान, आंधप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली येथून भाविक दाखल होतात. रांगेत दर्शन घेतलेल्या पहिल्या भाविकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे.अधिकाºयांसह ४०० पोलीस कर्मचारी तैनातयात्रा काळात कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी यंदा उत्सव काळात जादा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच मंदिर परिसर व मंदिराची चावरिया यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली आहे. यात्रा महोत्सवात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह हिंगोली, वसमत, कळमनुरी, हट्टा, कुरूंदा तसेच नांदेड जिल्ह्यातील २५ पोलीस अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे. शिवाय २२० पोलीस कर्मचारी, १२५ होमगार्ड तसेच दंगानियंत्रण पथकासह बॉम्बशोधक व नाशक पथक, एटीएस चे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.शिवाय मंदिर व मंदिर परिसरात जागो- जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक साहित्यांच्या दुकानासह पेढे व प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. त्यांवरही खरेदीसाठी भाविकांची दिवसभर गर्दी राहते.मंदिरात दर्शनाला वेळ लागत असल्याने येथे रांगेत अनेक भाविकांना औषधोपचाराची गरज भासते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने संत नामदेव मंदिर सभामंडपात कक्षा उभारण्यात आला असून, अपातकालीन दोन रूग्णवाहिका ही राखीव ठेवण्यात आल्या आहेत.येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येथे दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांग बनविलेली असून, भाविकांना शांततेत दर्शन करता येईल यासाठी जागो- जागी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय वाहन तळाचीही व्यवस्था केली.या ठिकाणी पर राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन दर्शनासाठी येणाºया भक्तांची गर्दी असते. दिवसभर येथे भक्तांची वर्दळ असल्याने दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन संस्थानतर्फे केले आहे.