शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

चक्कर आल्याने हमालाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:17 IST

येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामात हमाली करणाऱ्या वसमतच्या कामगार हमालाचा चक्कर येऊन पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामात हमाली करणाऱ्या वसमतच्या कामगार हमालाचा चक्कर येऊन पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.कुरूंदा येथे स्वस्त धान्याचा शासकीय गोदाम आहे. या ठिकाणी वसमतचे कामगार हमाल या गोदामात पोते उतरवितात. पोते उतरताना वयोवृद्ध हमाल शेख मजहर शेख खादर (५३) यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. यावेळी ते जागीच मरण पावले, असे तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले. मयत हे वसमत येथील शुक्रवारपेठ भागातील रहिवासी आहेत. मयत शेख मजहर यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कुरूंदा पोलिसांनी भेट दिली. या घटनेबाबत पंचनामा करून मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी वसमतच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले होते.या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया कुरूंदा पोलीस ठाण्यात सुरू होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी शासकीय गोदामामध्ये कुरुंदा परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस