शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:15 IST

येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रलंबित प्रश्न उशिराने का होईना अखेर मार्गी लागला. मोठ्या थाटात भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला. परंतु नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत पाडण्यास सुरूवात करण्यात आल्याने ऐन सणासुदीतच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बसथांब्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी, या ठिकाणी साधे बसवेळापत्रकही लावण्यात आले नाही. तसेच विविध मार्गावरून धावणाऱ्या बस कोठे उभ्या राहणार आहेत, याचे फलकही डकविण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगोली बसस्थानकाची जिर्ण इमारत पूर्णत: मोडकळीस आल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पावसाळ्यात इमारतीला तर गळती लागते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न होता. जुनी इमारत मोडकळीस आल्याने लवकरच नवीन टोलेजंग इमारत उभी राहणार असल्याने आता या सर्व समस्यांतून सुटका होणार अशी नागरिक व प्रवाशांना आशा होती. परंतु बांधकाम प्रक्रिया संथगतिने सुरू असून प्रवाशीच हैराण आहेत.जून महिन्यात पाडली जाणार होती इमारत...४जूनच्या पहिल्या आठवड्यात जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी करण्याची तयारी सुरू होती. परंतु आॅगस्टमध्ये भूमिपूजन झाल्याने बांधकामास लवकर सुरूवात होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते केले होते. परंतु अद्याप प्रत्यक्षात बांधकामाला प्रारंभ झाला नाही, हे विशेष. आता ऐन सणासुदीतच जुने बसस्थानक पाडले जात आहे. त्यामुळे आगार प्रशासनातील कारभाराचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportराज्य परीवहन महामंडळ