शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कयाधू पुनरूज्जीवनार्थ १५४ गावांत दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:35 IST

काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मनियार, ्जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, डॉ. प्रेमेंद्र बोथरा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, रॅलीसाठी मदत करणाऱ्यांचा आमदार व जिल्हाधिकारी, सीईओंच्या वतीने सत्कार करण्यात आला.हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेली कयाधू नदी पासवाळ्यात कधी-कधी आक्राळ-विक्राळ रुप करु वाहते. ती जिल्ह्यात ८४ किलोमीटर क्षेत्रातून वाहते. मात्र पाऊस ओसरताच दुसºया दिवशी नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने वर्षभर जिल्ह्यातील लोकांना पाण्याच्या एका -एका थेंबासाठी भटकण्याची वेळ येते. ती वेळ कायमची थांबावी म्हणून नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानमध्ये डॉ.राजेंद्रसिंग राणा यांनी आठ नद्यांचे पुन्नरुजीवन केले. त्यामुळे त्या भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्यांचा हाच उपक्रम महाराष्टÑभर राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर हिंगोलीत ही मोहीम हात घेतली. या नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वाड्या, वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे त्या-त्या गावक्षेत्रात ही जलचळवळ राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नदीला जिल्ह्यातील ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट येऊन मिळतात. कयाधू नदीची एकूण लांबी ८४ किलोमीटर असून, तिला येऊन मिळणाºया ओढ्यांची लांबी ११७५ कि.मी. एवढी आहे. सर्व काही व्यवस्थित असले तरीही नदी कोरडीठाक झाली आहे. त्यामुळे तिला जिवंत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी कळमनुरी, सेनगाव, हिंगोली येथे दहा दिवस जलदिंडी निघणार आहे. या दिंडीत जवळपास ५० महिला आणि ५० पुरुष सहभागी झाले असून, त्या- त्या गावातील ग्रामस्थ हे पाच किमी अंतरापर्यंत सहभागी होणार आहेत. असे एकूण दीड हजाराच्या जवळपास ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे संस्थाध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले. तर रॅलीत महिला लेझीम पथक सर्वांचे आकर्षण ठरले.जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी जलयुक्त विभागासह विविध शासकीय कर्मचाºयांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ही आप- आपल्या कर्मचाºयांना सूचना देणार असल्याचे सांगितले.पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, सीसीटी, लूझ बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे, बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे, जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती, खोलीकरण करणे, शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे, ओढ्याचे खोलीकरण करणे ही कामे केली जाणार आहेत.डॉ. किशन लखमावार आणि डॉ. संजय नाकाडे यांच्यावतीने रॅलीतील सहभागी पैकी कोणाची प्रकृती बिघडल्यास प्रथमोउपचार पेटी दिली. तर सोर्सा कॉम्प्युटरच्या वतीने लिंबू पाण्याची दिलेली पाकिट जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रॅलीतील सहभागींना वाटली.पूर्वी संत गाडगे महाराज गोपाल काल्यानंतर कीर्तनांतून लोकांना प्रबोधन करत असत, तसेच या जलदिंडीद्वारेही घरोघर भाकरी मागून एकत्र येत गोपालकाला केला जाणार आहे. गोपाल काल्यानंतर नदीच्या पुनरुजीवनासाठी जनजागृती केली जाणार आहे.रॅलीच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर आ. तान्हाजी मुटकुळे व आ. रामराव वडकुते म्हणाले, तेथे जेव्हा गरज भासेल तेव्हा मदत मागा आम्ही काही वेळातच मदतीसाठी धावून येऊ. तर त्या- त्या गावातील कार्यकर्त्यांना सूचनाही देतो.अशी केली जाईल जनजागृती४नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रथम ग्रामस्थांना पुनरुज्जीवत केले जाईल. त्यांनी श्रमदान करून आपल्या परिसरातील डोंगरमाथ्यावर सीसीटी, डीपीसीसीटी, बांध बंदिस्ती करावी, यासाठी ते यातून पुढे येतील, असे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी