औंढा नागनाथ तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने आवेदनपत्र स्वीकारण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. तर गुरुवारी केवळ ३ ग्रामपंचायतींच्या ११ सदस्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अर्ज संगणकीकृत करणे आवश्यक आहे. एकूण पाचशेच्यावर भावी ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी अर्ज भरण्यासाठी औंढा येथील संगणक केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे जात पडताळणी प्रमाणपत्र उमेदवारांना मिळावे म्हणून सुटीच्या दिवशीही निवडणूक विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात व्यवस्था केली आहे. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक इच्छुकांनी उमेदवारांनी अर्ज करून तहसील कार्यालयातून जात पडताळणी करण्यासाठी पत्र घेतले असल्याची माहिती नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी दिली. फाेटाे नं १५
नामनिर्देशनपत्र संगणकीकृत करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST