सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.शि. संदीप मदन सोनटक्के (रा. मुंगसाजी माउलीनगर, बळसोंड) व पो.ना. श्रीराम गंगाराम पुरी (रा.सुराणानगर, हिंगोली) हे दोघे ७ एप्रिल रोजी रात्री ९.१५च्या सुमारास सेनगाव येथून हिंगोलीकडे दुचाकीवरून येत होते. त्यांची दुचाकी सेनगाव ते हिंगोली रोडवरील केसापूर पाटीजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीस एम.एच. २२-२००१ च्या टिप्पर चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात श्रीराम पुरी यांचा मृत्यू झाला, तर संदीप सोनटक्के हे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर, संदीप सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी टिप्पर चालकाविरुद्ध नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पो.उप.नि. अशोक कांबळे करीत आहेत.