शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:16 IST

घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : वाशिम ते कनेरगाव राज्य रस्त्यावर असलेल्या सायखेडापाटीजवळ २६ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वाशिमकडून कनेरगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या तपोवन येथील विनोद विश्वनाथ मते (वय ४८, रा. तपोवन, ता. सेनगाव) हे सकाळी तपोवनवरून तोंडगावमार्गे मुख्य राज्य रस्त्यावरून उकळीपेनकडे जात होते. सायखेडा पाटीजवळ मागून येणाऱ्या (ट्रक क्रमांक एमएच. १८, बीजी ११५५) या क्रमांकाने दुचाकी (एमएच ३८-एल २०६८) दुचाकीला धडक दिली. यामध्ये विनोद मते हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

प्रवास्यांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाशिम ग्रामीणचे ठाणेदार रमेश पाटील, सपोनि नरडे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी आले. जखमी महिलेला वाशीम येथील रुग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. विनोद मते हे उकळीपेन येथे एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जात होते, अशी माहिती वाशिम पोलिसांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातHingoliहिंगोली