शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Hingoli : हिंगोलीत एकजण कोरोना पॉझिटिव्ह; इतर चार संशयित क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:51 IST

दिल्ली येथून परतलेला एकजण निरीक्षणाखाली

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर आणखी चार संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात कझाकिस्तानमधून आलेल्या एकासह त्याचा भाऊ, एक ११ वर्षीय मुलगी व अन्य एक दिल्ली येथील मरकज कनेक्शन असल्यामुळे दाखल केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आला आहे. ३१ रोजी या रुग्णास कारोनाग्रस्ताचा क्लोज कॉन्टॅक्ट म्हणून दाखल केले होते. त्याची प्रकृती स्थिर असून स्वॅब चाचणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १ एप्रिल रोजी एका ११ वर्षाच्या मुलीस आयसोलेशनमध्ये दाखल केले असून तिला कारोना संसर्गाची लक्षणे आहेत. तिचा थ्रोट स्वॅब नमुना औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविला. १ एप्रिल रोजी रात्री कझाकिस्तानवरून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या एकासह त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून स्वॅब चाचणीसाठी औरंगाबादला पाठविले आहेत. 

पाचवा रुग्ण आज पहाटे पाचच्या सुमारास कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील औंढा येथील एकजण दाखल केला आहे. या रुग्णाचे दिल्ली येथील मरकज कनेक्शन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णाचाही स्वॅब पाठविला आहे. १ एप्रिलला  दाखल झालेल्या सर्वांचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे सध्या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या कोणी क्लोज कॉन्टॅक्ट आहे काय? याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली