शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:23 IST

कुटुंबाच्या सदस्यांसह इतरांचा समावेश

ठळक मुद्देसंशयित मध्ये 11 वर्षीय मुलीचा समावेश

हिंगोली : वसमत येथील ज्या रुग्णाचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्कातील ८ जणांना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेला पाठविले. तर काल दाखल झालेल्या इतर चारही जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वसमत येथील एकाचा कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा हादरला आहे. तर प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्यांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे. अशांची संख्या ८ आहे. या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले असून औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. काल दाखल झालेल्या इतर चार जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात एका ११ वर्षीय मुलीचा समावेश होता. शिवाय कझाकिस्तानमधून आलेल्या एकासह त्याच्या भावालाही दाखल केले होते. तर अन्य एक कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील व्यक्ती होती. या चारही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निश्वास सोडला असतानाच कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील नवीन आठ जण दाखल केल्याने त्यांच्या अहवालाची चिंता आहे.

वसमतमध्ये होणार सर्व्हेक्षणकोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशान्वये वसमतमध्ये कंटेनमेंट आणि बफर झोनची कार्यवाही सुरू झाली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये तो व्यक्ती राहात असलेल्या आजूबाजूचा तीन किमीपर्यंतच्या परिसरात एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्व्हेक्षण केले जाईल. हा व्यक्ती कोणाच्या संपर्कात आल्यास माहिती घेतली जाणार आहे. यासाठी प्रतिपथक ५0 घरे रोज सकाळी १0 ते दुपारी २ या काळात सर्व्हेक्षण होणार आहे. यात कोणी जवळच्या संपर्कातील व्यक्ती आढळल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करून थ्रोट स्वॅब घेतले जाणार आहे. याशिवाय या भागात कुणाला फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जाणार आहे. तर सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास अशांना जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित केले जाणार आहे. बफर झोनमध्ये कंटेनमेंट झोनच्या शेजारील पाच किमी परिघातील भाग. या भागातील नागरिकांनी आरोग्यविषयक काही समस्या असल्यास उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे संपर्क साधून औषधोपचार घेणे. यासाठी २१ पथके व पर्यवेक्षकिय वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली