शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : उपासमारीची वेळ आल्याने जालन्यातून ३३ मजूर रातोरात गेले मध्यप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 18:10 IST

बदनापूर तालुक्यातील महामार्गाच्या कामावर होते मजुरीवर

ठळक मुद्देशुक्रवारी सगळे झाले गायबमध्य प्रदेशातील गावात पोहनचले

- दिलीप सारडा 

बदनापूर : तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातील केळीगव्हाण- समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले मध्य प्रदेशातील ३३ मजूर आपल्या मुलाबाळांसह रातोरात मध्यप्रदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत संबंधित विभागासही थांगपत्ता लागलेला नाही.  

तालुक्यातील केळीगव्हाण शिवारात पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटरचे काम सुरू आहे. हे काम केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग व पठार देऊळगाव ते बावणे पांगरी या दोन टप्प्यांमध्ये आहे. यापैकी पठार देऊळगाव ते बावणे पांगरी हा टप्पा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, केळीगव्हाण ते समृध्दी महामार्ग या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाकरीता मध्यप्रदेशातील एकूण ३३ मजुरांना येथे आणण्यात आले होते. यामध्ये (बनहुर, जि. खरगोन धुलकोट, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) अशा विविध गावातील महिला व पुरूषांचा समावेश होता.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वत्र ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर कुणीही अन्न- पाण्यावाचून राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. परंतु, या कामावरील मजुरांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु, त्यांनी केळीगव्हाण येथे जावून अन्नपाणी देण्याची मागणी केली. त्यानंतर तेथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या मजुरांविषयी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांनी मजुरांची भेट घेतली. त्यांना एक गोणी तांदूळ व एक गोणी गव्हाचे वाटप केले होते. तसेच ग्रामस्थांनीही मिठ- मिरची, तेल, हळद अशा वस्तू या मजुरांना दिल्या होत्या.

शुक्रवारी सगळे मजूर गायब गुरूवारपर्यंत या कामाच्या ठिकाणी हे सर्व मजूर उपस्थित होते. परंतु, शुक्रवारी सकाळी या ठिकाणी हे मजूर व त्यांचे सामान नसल्याचे ग्रामस्थांना दिसले. पोलीस पाटील रामेश्वर मदन म्हणाले, हे मजूर गुरूवारपर्यंत मी स्वत: बघीतले होते. शुक्रवारी सकाळी मी तेथे गेलो असता तेथे मध्य प्रदेशातुन आलेले एकही मजूर नसून, त्यांचे साहित्यही नव्हते. हे मजूर रात्री एखाद्या वाहनाने येथून गेल्याचे दिसत आहे. 

संबंधित विभागाला खबरच नाहीअभियंता सुदाम शिंदे म्हणाले, मी ‘लॉकडाऊन’च्या काळात या मजुरांना अन्नधान्य पुरविण्यासंदर्भात संबंधित गुत्तेदाराला सूचना केली होती. गुरूवारपर्यंत मजूर तेथेच होते. शुक्रवारी हे मजूर गेल्याची मला माहिती नाही.

मजूर गावी पोहनचले

मी शुक्रवारी मजुरांविषयी संबंधित गुत्तेदाराशी संपर्क साधला. त्यांनी हे मजूर आपापल्या गावी गेल्याचे सांगितले. या मजुरांपैकी एका महिलेसोबत माझे मोबाईलवरून बोलणे झाले असून, त्या महिलेने आम्ही आमच्या गावी पोहचल्याचे मला सांगितले आहे. - छाया पवार, तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना