शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : '...तर टेरेसवरून उडी टाकून जीव देतो'; कोरोनावर उपचार न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:37 IST

हिंगोलीतील जिल्हा कोविड रुग्णालयात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत इंगोले नामक एक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा झाल्याने दाखल आहे.

ठळक मुद्देया कर्मचाऱ्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे व्हायरल क्लिपवरून जाणवत आहे.माझ्याकडे पैसेही नाहीत. मला मदत करायची तर सोडा साधे बघायलाही कुणी येत नाही.

हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला उपचार मिळत नसल्याने आता मला उपचार मिळाले नाही, तर टेरेसवरून उडी मारून जीव देतो, असा इशारा देणारी क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी डॉक्टरांना पाठवले असून आता तो कर्मचारी व्यवस्थित असल्याचे सांगितले.

हिंगोलीतील जिल्हा कोविड रुग्णालयात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत इंगोले नामक एक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा झाल्याने दाखल आहे. या कर्मचाऱ्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे व्हायरल क्लिपवरून जाणवत आहे. या कर्मचाऱ्याने म्हटले की, तात्काळ मदत मागता मागता मला जीव देण्याची वेळ येत आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना ही अवस्था आहे. मी येथे दाखल असून मला अस्थमाचा त्रास असताना दुसराच उपचार केला जात आहे. शिवाय माझी आई एकीकडे तर वडील माझ्यासोबत ॲडमिट आहेत. माझ्याकडे पैसेही नाहीत. मला मदत करायची तर सोडा साधे बघायलाही कुणी येत नाही. मी माझ्या वरिष्ठांशीही संपर्क साधला तरीही प्रतिसाद मिळत नाही. बघायला येणार... येणार... असे सांगितले जात आहे. मात्र, येत कोणी नाही. त्यामुळे मी टेरेसवरून उडी टाकून माझा जीव देत आहे, असा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर यंत्रणा जागी झाली. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टरही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या कर्मचाऱ्याला जाऊन आमचे अधिकारी भेटले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी डॉक्टरही पाठिवण्यात आला. त्यांच्या आम्ही आता सतत संपर्कात आहोत. त्यांच्या अडचणी सोडविल्या असून आणखी काही अडचण आल्यास ती सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीPoliceपोलिस