शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : आजार दडवू नका ! वेळेवर उपचार न घेतल्याने कोरोनाबाधिताचा रुग्णालयाच्या दारातच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 17:38 IST

corona virus : मृत्यूनंतर करण्यात आलेल्या चाचणीत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देरुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांची चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली

सेनगाव: श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. मृत्यूनंतर केलेल्या चाचणीत वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागात वेळेवर चाचणी करून उपचार न घेतल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्धास श्‍वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या दारात येताच रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली. तसेच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक सुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. मृतावर नगरपंचायतीच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार कांबळे, मुख्याधिकारी फडसे हे उपस्थित होते. 

लक्षणे दिसताच उपचार घ्या सेनगाव तालुक्यात सध्या ८० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर गंभीर रुग्णांवर हिंगोली येथे उपचार देण्यात येतात. गुरुवारी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर आज दुपारपर्यंत दोन रुग्णांचा उपचार झाला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात आजार दडवून ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. लक्षणे दिसताच चाचणी करून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीDeathमृत्यू