शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र, ...

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र, आता मोबाइल, टीव्ही पाहण्याचा छंद, कोरोना काळातील विविध चिंतांनी अनेकांची झोपच उडविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने कहर केला. त्याचा प्रत्येक बाबीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. रोजगार, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण झाले. रिकामेपणी अनेकांना मोबाइल अथवा टीव्ही पाहत बसून जागरणाची सवय जडली, तर काहींना या चिंतांनी ग्रासल्याने झाेप येत नाही. अशांपैकी अनेक जण डॉक्टरांकडे हजेरी लावून मला झोपच येत नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यातच अंगमेहनतीची कामे कमी झाल्यानेही अनेकांना झोपेच्या त्रासाचा सामना करावा लागतो, तर दिनचर्या बदलल्याचा काहींना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

सततच्या जागरणाने रक्तदाबाचा त्रास होतो.

हृदयविकाराचा त्रासही जाणवण्याची भीती

मधुमेहाचा आजारही जडू शकतो.

इतरही शारीरिक व्याधींचा धोका

वयोमानानुसार झोपेचे तास ठरतात. त्यातुलनेत सतत अनेक दिवस झोप न लागल्यास विविध व्याधी जडू शकतात. वेळेवर झोपणे व उठणे ही चांगली सवय आहे.

-डॉ. यशवंत पवार

झोप का उडते?

जास्त ताणतणावात दिवस गेल्यास अथवा चिंता वाढल्यास झोप लागत नाही. शिवाय मोबाइल अथवा टीव्हीची सवय लागली तरीही असे घडते.

जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत, अशांनाही लवकर झोप न लागल्याच्या समस्या अनेकदा जाणवतात.

गंभीर आजार असल्यास किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणींमुळेही निद्रानाशाची चिंता भेडसावू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेक जण झोप येत नसल्याने त्यावरील योग्य उपाय शोधण्याऐवजी थेट झोपेच्या गोळीचा आग्रह धरतात. मात्र, ती एक घातक सवय ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेणे टाळणेच हिताचे राहील.

नेमकी किती झोप हवी?

नवजात बाळ १२ ते १४ तास

एक ते पाच वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२२ ते ४० वर्षे ८ ते ९ तास

४१ ते ६० ८ तास

६१ पेक्षा जास्त १० तासांपर्यंत

चांगली झोप यावी म्हणून

सकाळी लवकर उठावे.

व्यायाम व शारीरिक कष्ट करावे.

आहार व्यवस्थित व वेळेवर घ्यावा.

मानसिक त्रागा करू नये.

योग्य व प्रामाणिक काम करून व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, आदी केल्यास झोपेबाबतची कोणतीच तक्रार राहणार नाही.

- डॉ. गोपाल कदम