शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:34 IST

काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी राज्यभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेनिमित्त २७ आॅक्टोबरला ते हिंगोली जिल्ह्यात दोन सभा घेणार आहेत. शनिवारी खा.राजीव सातव यांनी हिंगोलीत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांनी या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जनसामान्यांना सोबत घेवून मैदानात उतरण्याचे आवाहन केले. तर रविवारी माजी आ.भाऊ पाटील यांनी निवासस्थानी बैठक घेतली. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. एकप्रकारे हा शक्तीप्रदर्शनाचाच प्रकार होता. मात्र यात अंतर्गत गटबाजीवरून टीका-टिपण्णी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. गोरेगावकर यांनी मात्र केवळ भाजपवरच आसूड ओढले. अंतर्गत वादाच्या मुद्यावर कोणीही आपल्या भाषणात लवलेशही दाखविला नाही. गोरेगावकर म्हणाले, कार्यकर्तेच माझी शक्ती असल्याने या शक्तीच्या जोरावरच मी पक्षाचे काम करतो.मराठवाड्याचे भूमिपुत्र अशोक चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले. तर केंद्र व राज्य शासनासह स्थानिक आमदारांवर जोरदार टीका केली. भाजपाचे सरकार केवळ बोलघेवडे असून, शेतकºयांसह व्यापारी, शेतमजूर अडचणीत आहे. वीज रोहित्र मिळत नाही, कर्जमाफी, पीककर्ज, पीकविम्यासारख्या अनेक समस्या भेडसावत असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. इंधन दरवाढ झाली. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली, कर्जमाफी नेमकी कुणाला भेटली, हे कळायला मार्ग नाही.या बैठकीस हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशंचद्र बगडीया, ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा, सावरमल झुनझुनवाला, जि.प.चे शिक्षण सभापती भैय्या देशमुख, दाजीबा पाटील, बाजीराव इंगोले, भीमाशंकर सराफ, गजानन पोहकर, व्दारकादास सारडा यांची उपस्थिती होती. तर सुनील पाटील, देवराव जाधव, प्रकाश देशमुख, रुपाजी कºहाळे, कांतराव हराळ, अ‍ॅड. अरगडे, नजीर अहेमद, देवराव जाधव, ज्ञानेश्वर गोटरे, सुमित चौधरी, मिलींद उबाळे, समीर भिसे, निरज देशमुख, अशोक चव्हाण, केशव दुबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस