शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या ७१४ घरकुलांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:20 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे.सेनगाव तालुक्यात घरकुल योजनेच्या कामाने गती पकडली आहे. तालुक्यात मागील दोन आर्थिक वर्षात रखडलेल्या घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. लाभार्थ्यांना घरकुल अनुदान वेळेत न मिळणे, झालेल्या कामाचा पाठपुरावा करुनही मूल्यांकन न होणे यासह विविध कारणांमुळे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या ७५३ पैकी ६६३ कामे रखडली होती. तर चालू आर्थिक वर्षात पुन्हा नवीन २६० घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. तर रमाई आवास योजनेत२०१६-१७ मध्ये२५४ घरकुल मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ बारा पूर्ण झाले होते. तर २४२ कामे रखडली होती. त्यात पुन्हा नवीन २१८ घरकुल मंजूर झाले आहेत. त्यामुळे एकूण घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे मोठे आवाहन पंचायत समिती कार्यालयासमोर होते. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.व्ही.काळे यांनी या संबंधी मागील आठ महिन्यांपासून गावनिहाय भेटी देवून बांधकामे करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तांत्रिक अडचणी प्राधान्य देवून सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याने गेल्या आर्थिक वर्षातील ५८८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ७५ घरकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. तर रमाई आवासची २१६ कामे पूर्ण केली आहेत. तसेच दोन्ही योजनेतील १७५ अशी एकूण ७१४ कामे आजपर्यंत पूर्ण झाली आहेत. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सेनगाव पंचायत समितीच्या कामाचे कौतुक केले आहे.घरकुलाच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसे अभियंते नसतानाही कामे पूर्ण झाली. दोन वर्षांपासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील घरकुलांची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पूर्ण केल्याने मराठवाड्यातील इतर पंचायत समित्यांच्या तुलनेत सेनगावचे काम समाधानकारक आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHomeघर