शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:00 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा १00 टक्के हागणदारीमुक्त करायचा आहे. त्यामुळे मिशन म्हणून हे काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी केले आहे. जिल्ह्याला ८५ हजार ३१८ एवढे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्याने १२ हजार ७३३ पैकी १0 हजार १११, वसमतने १८ हजार ६६८ पैकी १२ हजार ४0६, हिंगोलीने १३ हजार ३८६ पैकी १0 हजार ५९0, कळमनुरीत २0 हजार १0 पैकी ९८९0, सेनगावात २0 हजार ५२२ पैकी १0 हजार ४७४ एवढ्या शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.यात औंढ्या तालुक्याला शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे २६२२, वसमतला ६२६२ तर हिंगोलीला २७९६ शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे. कळमनुरीला १0 हजार १२0 तर सेनगावला १0 हजार ४७४ असे मोठे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. जे आवाक्याबाहेर दिसून येत आहे. या दोन्ही तालुक्यांत सुरुवातीपासूनच ही कामे संथगतीने होत होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत कामे रखडलेली आहेत, अशा ठिकाणच्या सरपंचांना या कार्यशाळेद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे.यात ग्रामसेवक व सरपंचांनी काय करायचे याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यांनी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाºयांची पूर्वतयारी बैठक घ्यावी, यातून निवडलेल्यांना लाभार्थी दत्तक द्यावे, जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिलेल्या सूचना ग्रा.पं.स्तरावरील पदाधिकारी व कर्मचाºयांना द्याव्यात, लाभार्थी दत्तक देताना कर्मचारी व पदाधिकाºयांना सुलभपणे काम करता येईल, असाच लाभार्थी दत्तक द्यावा असे सुचित केले आहे. या पदाधिकारी, कर्मचारी मंडळीने लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून द्यावे, तर ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारावी, तांत्रिक अडचण असल्यास संबंधित कक्षाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले.